अरेरे किती ते दुदैव...पाहावा लागतोय Vegetarian वाघ,खिल्ली उडवणारा VIDEO व्हायरल

'क्या शेर बनेगा रे तू?' Vegetarian वाघाचा तो VIDEO व्हायरल 

Updated: Sep 29, 2022, 03:24 PM IST
अरेरे किती ते दुदैव...पाहावा लागतोय Vegetarian वाघ,खिल्ली उडवणारा VIDEO व्हायरल  title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरलं (Viral video) होत असतात.यातील काही व्हिडिओ खुपच मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात.  

व्हिडिओत काय?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक वाघ जंगलात (Tiger video) चालताना दिसत आहे. हा वाघ आपल्या शिकारकडे दुर्लक्ष करून चालताना दिसत आहे. या वाघाच्या मागे दोन हरणे आहेत. या हरणाची आतापर्यंत शिकार व्हायला पाहिजे होती. मात्र तस काय झालं नाही आहे. याउलट हरण या वाघामागे बिनधास्त फिरताना दिसत आहे. त्यामुळे नेमकं वाघाला झालंय तरी काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर अनेक नेटकरी वाघाची खिल्ली उडवतायत. 
 
आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हा व्हिडिओ (Tiger video) ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टला त्यांनी "वाघ त्यांच्या शिकारीला मारण्यात खरोखर किफायतशीर असतात. ते फक्त मारण्यासाठी मारत नाहीत, असे कॅप्शन दिले आहे.  

नेटकऱ्यांचे भन्नाट कमेंट 
नेटकऱ्यांनी या व्हि़डिओवर (Tiger video) तुफान कमेंट केले आहेत. एका य़ुझरने लिहिले की, "एका वन्यजीव व्यक्तीकडून असे ऐकले आहे की वाघ साधारणपणे आठवड्यातून एकदा शिकार करतो आणि अनेकदा करतही नाही! आठवड्यातून एकदाच शिकार करून तो समाधानी असतो. तर काहींनी हा वाघ वेजिटेरीअन असल्याची खिल्ली उडवलीय. आणि काहींनी 'क्या शेर बनेगा रे तू?' अशा फिल्मी स्टाईलमध्ये कमेंट केले आहे. 

दरम्यान सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral video) होत आहे.या व्हिडिओवर तुफान कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.