याला म्हणतात खरं प्रेम, गर्लफ्रेंडच्या मृतदेहाला मंगळसूत्र घालत तरूणाने घेतली ही शपथ, Vidoe व्हायरल

प्रेमवेड्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही!

Updated: Nov 21, 2022, 07:52 PM IST
याला म्हणतात खरं प्रेम, गर्लफ्रेंडच्या मृतदेहाला मंगळसूत्र घालत तरूणाने घेतली ही शपथ, Vidoe व्हायरल  title=

True Love News : आजचं प्रेम हे फक्त दिसण्यापासून सुरू होतं आणि बेडरूममधून बाहेर आल्यावर संपताना दिसतं. खऱ्या प्रेमाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. कलियुगात क्वचितच खरं प्रेम आपण पाहिलं असेल, कारण रिप्लाय लवकर देत नाही म्हणून अनेक कपल्सचे ब्रेकअप (Break Up) झालेले पाहिले असतील. अशातच एक आगळंवेगळं प्रेम प्रकरण (true love story in Guwahati) समोर आलं आहे ज्यामध्ये तरूणाने त्याच्या प्रेयसीसाठी जे काही कलं आहे त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.  (true love story in Guwahati Assam married with dead girlfriends body viral marathi news)

आसाममधील गुवाहाटी (Assam Guwahati  love story) येथील मोरीगाव येथील बिटुपन तामुली आणि चापरमुख येथील कोसुआ गावात राहणारी प्रार्थना बोरा दोघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांच्या प्रेमाबद्दल घरासह सर्व गावाला माहिती होती. मात्र प्रार्थना काही दिवसांनी आजारी पडते तिला गुवाहाटीमधील एका दवाखान्यामध्ये दाखल करण्यात येतं. मात्र दुर्देवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू होतो.

प्रार्थनाच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसतो. जेव्हा ही गोष्ट बिटुपनला समजते तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. जिच्यासोबत आपलं आयुष्य घालवण्याचं ठरवलं तिच्या अशा जाण्याने तो आतुन पुर्णपणे तुटून जातो. प्रार्थनाचं पार्थिव घरी ठेवलेलं असतं तेव्हा बिटुपन त्यांच्या घरी जातो. 

 

प्रार्थनाच्या गळ्यात हार घालतो, दुसरा हार स्वत:च्या गळ्यात घालतो. त्यानंतर तिच्या कपाळात सिंदुर भरतो असे लग्नाचे विधी पूर्ण करत शेवटी तिला कवटाळून मिठी मारतो. यावेळी त्याने आयुष्यभर अविवाहित राहण्याची शपथ घेतली. हे सर्व पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी येतं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहून सगळेच भावूक झाले आहेत.