एकमेकांना धडकणार होती ही 2 विमानं पण मोठा अनर्थ ठळला

दोन्ही विमान एकमेकांच्या इतक्या जवळ आले

Updated: Jul 12, 2018, 03:20 PM IST
एकमेकांना धडकणार होती ही 2 विमानं पण मोठा अनर्थ ठळला

नवी दिल्ली : इंटरग्लोब एविएशन एअरलाईन इंडिगोच्या दोन विमानांची धडक होता होता वाचली आहे. दोन्ही विमान एकमेकांच्या इतक्या जवळ आले की एकमेकांना ठोकले गेले असते. विमानातील प्रवाशांच्या जीव यावेळी धोक्यात आला होता. काही सेंकदात हे विमानं एकमेकांना ठोकली असती पण थोडक्यात वाचली. ही घटना 10 जुलैची आहे. बंगळुरु एअरबेसच्या वर इंडिगोच्या या 2 विमानांची धडक झाली असती जर पायलटने लगेच निर्णय अॅक्शन घेतली नसती. 

हैदराबाद-कोच्ची विमान आले समोरासमोर

10 जुलैला बंगळुरु एअरबेसच्या वर उड्डाण होत असतांना कोयंबतूर येथून हैदराबादला 6E 779 आणि बंगळुरु येथून कोच्चीला जाणारं 6E 6505 यांच्यात टक्कर झाली असतीव. विमानं एकमेकांच्या खूप जवळ आले होते. पण थोडक्यात वाचले.

328 प्रवाशांचा जीव आला होता धोक्यात

इंडिगोच्या माहितीनुसार हैदराबादच्या फ्लाईटमध्ये जवळपास 162 प्रवासी होते तर कोच्चीच्या फ्लाईटमध्ये 166 प्रवासी होते. दोन्ही विमान फक्त 200 फूट एकमेकांपासून लांब होते. विमान एकमेकांना ठोकण्याआधी ट्रॅफिक कॉलिजन एवॉयडेंस सिस्मट (TCAS)चा अलार्म वाजला आणि हा अपघात होता होता वाचला. एयरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन बोर्ड (AAIB) या प्रकरणाची चौकशी करत आहे.

या आधी ही घडल्या आहेत अशा घटना

हवेत विमानं एकमेकांच्या जवळ येण्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडल्या आहेत. इंडिगोचं हे पहिलंच प्रकरण नाही. याआधीही इंडिगोचं विमानं एकरमेकांना ठोकण्यापासून वाचली होती. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इंडिगोच्या एका विमानाच लॅपटॉपचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याआधी दिल्ली एअरपोर्टपर इंडिगो आणि एअर इंडियाचं विमान देखील एकमेकांना धडकलं असतं पण ते थोडक्यात वाचलं. यावेळी एक विमान लँड होतं होतं तर दुसरं विमान टेकऑफ करत होतं. पण सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close