UPSC Success Story: हवालदार असताना वरिष्ठाने केला होता अपमान, आता त्याच्यासारख्या 56 अधिकाऱ्यांचा बॉस होणार!

UPSC Success Story Of Uday Krishna Reddy : 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशातील पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर (CI) यांनी 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 17, 2024, 05:46 PM IST
UPSC Success Story: हवालदार असताना वरिष्ठाने केला होता अपमान, आता त्याच्यासारख्या 56 अधिकाऱ्यांचा बॉस होणार! title=

UPSC Success Story: पोलीस कॉन्स्टेबल असलेले उदय कृष्ण रेड्डी यांनी युपीएससीच्या सिविल सर्विसेस परीक्षा 2023 क्रॅक करुन मोठं यश संपादन केलंय. त्यांच्या जीवनातील हे सर्वात मोठे यशच नाही तर अपमानाचा खूप मोठा बदला त्यांनी घेतला आहेय उदय कृष्ण रेड्डी यांचा पोलीस विभागातील एका सिनिअर अधिकाऱ्याने अपमान केला. या अपमानानंतर त्यांनी पोलिसातील नोकरी सोडून दिली. एवढंच नव्हे तर त्यानंतर सर्वात मोठा अधिकारी होण्याचा निश्चय केला. ज्याचा बदला त्यांनी तब्बल 6 वर्षांनी घेतला. 

कुणी केला होता अपमान 

साल 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. असं सांगितलं जातं की, 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर CI ने जवळपास 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला. तात्काळ या अपमानाचा बदला घेत उदय यांनी राजीनामा दिला. 

अशी केली UPSE क्रॅक 

कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिल्यानंतर उदय कृष्ण रेड्डी यांनी यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरु केली. यानंतरचा सगळा फोकस हा आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षा 2023 मध्ये 780 रँक पटकावला. 

पालकांच छत्र हरपलं

उदय कृष्ण रेड्डी आंध्रप्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा मंडळाच्या उल्लापलेम गावात राहत होते. त्यांनी कमी वयातच आपल्या पालकांना गमावलं होतं. त्यानंतर त्यांच्या आजीनेच त्यांचे संगोपन केले. 2013 मध्ये कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. रेड्डी यांनी पाच वर्षांची सेवा केल्यानंतर राजीनामा दिला. आणि चौथ्या प्रयत्नात 780 रँक पटकावली. 

संघ लोक सेवा आयोगाच्या सिविल 2023 परीक्षेत आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिय रँक पटकावली. दुसऱ्या नंबरवर अनिमेष प्रधान, तिसऱ्या नंबरवर डोनुरु अनन्या रेड्डी, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पीके सिद्धार्थ राजकुमार आणि रुहानी आहे. यावर्षी एकूण 1016 उमेदवार परीक्षेत होते. ज्यामध्ये 347 जनरल कॅटेगिरी, 115 ईडब्ल्यूएस, 303 ओबीसी, 165 एससी आणि 86 एसटी कॅटेगिरी मध्ये उमेदवार होते.