अरेरे ! घरात करोडोंची संपत्ती सापडलेल्या व्यापाऱ्यावर आज आली अशी वेळ

करचोरी आणि करोडोंची अघोषित संपत्ती जमवल्याप्रकरणी कानपूरचे परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री अटक केल्यानंतर पियुष जैन याला सोमवारी रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. पीयूष जैनला अटक केल्यानंतर पोलीस चौकीत एका खोलीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली.

Updated: Dec 27, 2021, 06:34 PM IST
अरेरे ! घरात करोडोंची संपत्ती सापडलेल्या व्यापाऱ्यावर आज आली अशी वेळ title=

कानपूर : करचोरी आणि करोडोंची अघोषित संपत्ती जमवल्याप्रकरणी कानपूरचे परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रात्री अटक केल्यानंतर पियुष जैन याला सोमवारी रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. पीयूष जैनला अटक केल्यानंतर पोलीस चौकीत एका खोलीत जमिनीवर झोपण्याची वेळ आली.

डीजी जीएसटी टीमने परफ्यूम व्यापारी पीयूष जैन यांच्याविरोधात 31 कोटी 50 लाख रुपयांच्या करचुकवेगिरीचा गुन्हा दाखल केला आहे. जीएसटी पथकाने जैन यांच्या कोठडीची मागणी केली आहे. आता डीजी जीएसटी इंटेलिजन्स टीमचा प्रयत्न पीयूष जैन यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न असेल.

पान मसाला आणि इतर व्यवसायाशी संबंधित अमाप मालमत्तेचे मालक पीयूष जैन यांना सोमवारी कानपूर येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. रविवारी अटक केल्यानंतर पियुष जैन कानपूरच्या काकादेव पोलीस ठाण्यात रात्रभर थांबले आणि सकाळी जीएसटी टीम त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन गेली. 

न्यायालयात फिर्यादी व बचाव पक्ष यांच्यात बराच वेळ वादावादी झाली. बचाव पक्षाने रिमांड रद्द करण्यासाठी अर्ज केला होता, तो न्यायालयाने फेटाळला. भारत सरकारचे विशेष सरकारी वकील अमरीश टंडन यांनी सांगितले की, न्यायालयाने उद्योगपती पीयूष जैन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पियुष जैन यांनी कबूल केले आहे की निवासी जागेतून जप्त केलेली रोकड जीएसटीशिवाय वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आहे. त्यांना जीएसटी कलम 132 अंतर्गत तुरुंगात पाठवले जात आहे.

परफ्यूम व्यापारी पियुष जैन याला जीएसटी इंटेलिजन्स अहमदाबादच्या पथकाने सोमवारी दुपारी 4 वाजता रिमांड मॅजिस्ट्रेट योगिता कुमार यांच्या न्यायालयात हजर केले. जीएसटी अधिकाऱ्यांनी त्याला कोर्टाच्या आत नेताच दरवाजे बंद करण्यात आले आणि बाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. जीएसटीचे विशेष अभियोग अधिकारी अंबरीश टंडन यांनी सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपीच्या कोठडीची मागणी केली. यावर बचाव पक्षाचे वकील सुधीर मालवीय यांच्या वतीने रिमांड रद्द करण्यासाठी अपील करण्यात आले. दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर रिमांड मॅजिस्ट्रेटने विशेष अभियोग अधिकाऱ्यांच्या म्हणण्याशी सहमती दर्शवत पियुष जैन याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, न्यायालयाने बचाव पक्षाचा रिमांड रद्द करणारा अर्ज फेटाळून लावला.

जीएसटी इंटेलिजन्सने परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्याकडून 177 कोटी रुपयांची वसुली दाखवली आहे. कोर्टात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, जीएसटी इंटेलिजन्सला हे पैसे पियुषच्या बेडरूममधून आणि तीन कॅबिनमधून मिळाले आहेत. वर्षभरात बेकायदेशीरपणे कमाई करण्यात आली आहे. हा पैसा विनापरवाना काढण्यात आला आहे.