परिवहन मंत्र्यांनीच केली सार्वजनिक शौचालयाची सफाई

उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर विरोधक नेहमीच टीका करत असतील. मात्र, असे असले तरी योगी सरकारमधील मंत्री आपल्या कर्त्यव्यापासुन दूर पळत नाहीत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 17, 2017, 02:16 PM IST
परिवहन मंत्र्यांनीच केली सार्वजनिक शौचालयाची सफाई  title=
Image: Twitter

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर विरोधक नेहमीच टीका करत असतील. मात्र, असे असले तरी योगी सरकारमधील मंत्री आपल्या कर्त्यव्यापासुन दूर पळत नाहीत.

होय, योगी सरकारमधील परिवहन मंत्र्यांनी चक्क शौचालयाची साफसफाई केली आहे. परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह हे बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी मिर्झापूर बस स्थानकावर पोहोचले. मात्र, त्या ठिकाणचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.

यानंतर स्वत: परिवहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी आपल्या हातात झाडू घेत शौचालयाची स्वच्छता केली. परिवहन मंत्र्यांनीच साफसफाई करण्यास सुरुवात केल्याने सर्वांनाच धक्का बसला.

परिवहन मंत्र्यांनी पाहणी केली असता त्यांना बस स्थानकात घाणीचं साम्राज्य असल्याचं दिसलं. कुठं पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याचं दिसलं. तर कुठं गुटख्याचे रॅपर पडलेले होते.

यानंतर परिवहन मंत्र्यांनी वाहक, चालक, सफाई कामगार इन्चार्ज यांना बोलावून ताकीदही दिली.