आता गाझियाबाद जिल्ह्याचं नाव बदलणार? 'हे' असणार नविन नाव

Ghaziabad Story: अलाहाबादचं प्रयागराज नामकरण झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद शहराचं नाव बदलण्यात येणार आहे. महापालिकेच्या बैठकीत याला मंजूरीही देण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून गाझियाबादचं नवा बदलण्याची मागणी केली जात आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 9, 2024, 09:09 PM IST
आता गाझियाबाद जिल्ह्याचं नाव बदलणार? 'हे' असणार नविन नाव title=

Ghaziabad New Name: उत्तरप्रदेशमधल्या गाझियाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्याची मागणी गेल्या काही काळापासून होत आहे. गाझियाबाद महापालिकेच्या बैठकीत याबाबत चर्चाही करण्यात आली. विशेष म्हणजे याला मंजूरीही देण्यात आली आहे गाझियाबासाठी काही नावांचा पर्यायही सुचवण्या आल आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी उत्तर प्रदेश सरकारकडे (UP Government) पाठवला जाणार असल्याची माहिती महापौर सुनीता दयाल यांनी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. हिंदु संघटनांकडून गाझियाबादचं (Gaziabad) नाव बदलण्याची मागणी सातत्याने करण्यात येतेय.

1740 मध्ये गाझाउद्दीन नगर
उत्तरप्रदेशमधल्या अलाहाबादचं नाव प्रयागराज झाल्यानंतर ऐतिहासिका गाझियाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्याचीही मागणी जोर धरु लागली. हिंदुत्त्ववादी संघटनांबरोबर इथले आमदार सुनील शर्मा यांनीही नामकरणाची मागणी केली आहे. मुघल शासनातर 1740 मध्ये या शहराची स्थापान झाली. त्यामुळे सुरुवातीला या शहराचं नाव गाझाउद्दीन नगर असं ठेवण्यात आलं. 

गाझियाबाद जिल्ह्याच्या सरकारी वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार 1740 साली वझीर गाझी-उद-दीन याने या जिल्ह्याची स्थापना केली. तेव्हा पासून हा जिल्हा गाझीउद्दीन नगर नावाने ओळखला जाऊ लागला. पण या जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर इंग्रजांना हे नाव मोठं वाटू लागलं त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याचं नाव गाझियाबाद असं ठेवलं.

14 नोव्हेंबर 1976 पर्यंत गाझियाबाद मेरठ जिल्ह्याअंतर्गत येत होतं. पण यानंतर गाझियाबाद स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात आला. उत्तर प्रदेशम्ये जिल्ह्यांची नावं बदलण्याच्या प्रक्रियेत मुघलांच्या काळातील गाझियाबादचं नाव बदलून सनातन धर्माी जोडलं जावं अशी मागणी होऊ लागली.

या नविन नावांवर विचार?
गाझियाबाद जिल्ह्याचं नाव गजनगर, हरनंदी नगर किंवा दूधेश्वर नगर ठेवण्याबाबत विचार सुरु आहे. इतिहासकालीन दस्ताऐवजांमध्ये हस्तिनापूरच्या उत्तरी भागात घनदाट जंगल होतं. इथे हत्तींचा मोठा वावर होता त्यामुळे या भागाला गजनगर (Gajnagar) नाव द्यावं असंही पुढे आलं. हरनंदी नगरचं (Harnandi Nagar) नाव हिंडौन नदीवरुन पुढे आलं आहे. तर दुधेश्वर नगर (Dudheshwar Nagar) हे गाझियाबादमधल्या प्रसिद्ध दुधेश्वरनाथ मंदिरावरुन पुढे आलंय.