Indian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?

Indian Railway ची कमाल, प्रवासी होणार मालामाल... रेल्वेचा प्रवास करताना इतका कमाल अनुभव मिळेल की पाहून व्हाल हैराण!   

सायली पाटील | Updated: Apr 11, 2024, 03:42 PM IST
Indian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?  title=
Vande Bharat Sleeper Train will provide flight like facilities indian railway news

Indian Railway : हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात यामध्ये काही व्हिडीओ इतक्या कमाल गोष्टी तुमच्यापुढं आणतात की पाहतनाच हैराण व्हायला होतं. या व्हिडीओंच्या गर्दीत सर्वाधिक Views मिळणारे Videos असतात ते म्हणजे विमान प्रवासाचे आणि त्यातही विमानातील Business Class चे. विमानानं प्रवास करत असताना तिथं मिळणाऱ्या सुविधांचा अनेकांनाच हेवा वाटत असतो. पण, कैक वेळा खर्चाचा आकडा परवडत नाही, त्यामुळं हा प्रवास अनेकांना शक्य होत नाही. 

अशा सर्वांसाठीच आता भारतीय रेल्वे एक कमाल सुविधा किंबहुना एक कमाल ट्रेन आणत आहे. ही रेल्वे म्हणजे वंदे भारत. जिथं सध्याच्या वंदे भारत ट्रेमध्ये फक्त Seating चीच व्यवस्था आहे, तिथं आता या रेल्वेला स्लीपर कोचसह प्रवाशांच्या सेवेत आणलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच या स्लीपर कोचच्या कारचं बॉडी स्ट्रक्टर लाँच केलं. येत्या काही दिवसांत आता ही रेल्वे रुळांवर धावताना दिसणार आहे. ज्यामुळं रेल्वे प्रवासाचा चेहरामोहराच बदलणार आहे. 

वंदे भारतच्या स्लीपर कोच ट्रेनमध्ये कोणत्या सुविधा मिळणार? 

वंदे भारत स्लीपर ट्रेन (BEML वर्जन)च्या पुढील भागात फ्रंट फेशिया डिझाइन असेल, गरुडापासून या आराखड्याची प्रेरणा घेण्यात आली आहे. वंदे भारतच्या या स्लीपर कोचमध्ये इंटर कम्युनिकेशन गेट्स आणि नॉइस इन्सुलेशन असल्यामुळं या केबिनमध्ये कमालीची शांतता जाणवेल. शिवाय दिव्यांग नागरिकांसाठी या ट्रेनमध्ये विशेष बर्थ आणि स्वयंचलित दरवाजे असतील. ही ट्रेन सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुसज्ज असून कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये पुश बटन स्टॉप दाबून ती थांबवता येईल. 

हेसुद्धा वाचा : Vande Bharat : सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट 

वंदे भारत ट्रेनमधील शौचालय एर्गोनॉमिक स्वरुपात डिझाईन करण्यात आलं आहे, ज्यामुळं दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना होणार नाही. गरम पाण्याच्या शॉवरपासून या ट्रेनमध्ये 1 एसी फर्स्ट कोच, 4 एसी 2-टियर कोच आणि 11 एसी 3-टियर कोच समाविष्ट असतील. काय मग... तुम्हीही या ट्रेननं प्रवास करणार ना?