५ ऑगस्टला उपराराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि निकाल

येत्या १० ऑगस्टला उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. येत्या पाच ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे.

Updated: Jun 29, 2017, 12:43 PM IST
५ ऑगस्टला उपराराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि निकाल title=

नवी दिल्ली : येत्या १० ऑगस्टला उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. येत्या पाच ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी याविषयीची घोषणा केली. हामीद अन्सारीं गेली १० वर्ष उपराष्ट्रपतीपदी विराजमान आहेत. या निवडणूकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातले सभासद मतदान करतात. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १८ जुलै आहे. तर अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख २१ जुलै आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अधिसूचना ४ जुलै रोजी जाहीर होईल.

दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने गोव्याच्या राजसभेच्या जागेसाठी देखील निवडणुकीची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या शांताराम नाईक यांचा कार्यकाळात २८ जुलै रोजी संपत आहे. या जागेसाठी 21 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल. नाईक हे १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान करु शकतील.