या रेस्टॉरंटमध्ये 'बुलेट ट्रेन' थेट टेबलावर जेवण आणते, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा VIDEO

bullet train serve food video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे. या हॉटेलमध्ये चक्क 'बुलेट ट्रेन' लोकांना जेवण देताना दिसत आहे.  

Updated: May 18, 2022, 02:39 PM IST
या रेस्टॉरंटमध्ये 'बुलेट ट्रेन' थेट टेबलावर जेवण आणते, विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा VIDEO title=

मुंबई : bullet train serve food video : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे. या हॉटेलमध्ये चक्क 'बुलेट ट्रेन' लोकांना जेवण देताना दिसत आहे. दरम्यान, नागपूर शहरात हॉटेलमध्ये एका रोबोद्वारे  अशाप्रकारे ऑडर करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जेवण देणारा हा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. 

सहसा तुम्ही वेटरला रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जेवण देताना पाहिलं असेल. जरी काहीवेळा तुम्हाला तुमच्याच प्लेटमध्ये जेवण सर्व्ह करावे लागते. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही पाहायला मिळतात, ज्यामध्ये फूड सरप्राईज सर्व्ह करण्याचे एकापेक्षा एक जुगाड पाहायला मिळतात. आजकाल यंत्रे खूप प्रगत झाली आहेत, त्यामुळे ती माणसांचे काम स्वत: करताना असे व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते. काही कामं यंत्रांवर आधारित असतात, तर काही कामं अशी असतात की ज्यासाठी माणसाला यंत्रांची भुरळ पडण्याची गरज नसते, पण त्यानंतरही यंत्रे कोणत्या ना कोणत्या प्रकारे माणसांवर वर्चस्व गाजवत असतात. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहून तुम्हाला याची कल्पना येऊ शकते. 

हॉटेलमध्ये जेवण देण्यासाठी वेटरची नव्हे तर रोबोटची मदत घेतली जात असल्याचे काही दिवसांपूर्वी एका अहवालात समोर आले होते. आता या क्रमामध्ये 'बुलेट ट्रेन'चे नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे, जी ग्राहकांना त्यांच्या जागेवर अन्न पोहोचविण्यास मदत करते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक मायक्रो बुलेट ट्रेन धावताना दिसत आहे, जी ग्राहकांना त्यांच्या सीटवर जेवण पोहोचवताना दिसत आहे.

येथे व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लोकांना 'बुलेट ट्रेन'मधून जेवण देताना दिसत आहे. सर्वप्रथम, व्हिडिओमध्ये असे दिसून येते की हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये एक मोठे टेबल आहे, जिथे बरेच लोक त्यांच्या जागेवर बसून जेवणाची वाट पाहत आहेत, तेव्हाच टेबलावरुन 'बुलेट' ट्रेन येताना दिसते आणि ज्यांनी ऑडर केली आहे त्यांच्या ठिकाणी थांबते आणि ग्राहक स्वतःच जेवणाची भांडी काढू लागतात. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'अर्थलोकस' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 70 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, तर 68 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजर्सने लिहिले, 'प्रामाणिकपणे, ऑटोमेशनची ही पातळी मला घाबरवते', तर दुसऱ्या यूजर्सने या तंत्रज्ञानाचे वर्णन 'सुपर' असे केले आहे. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरने 'हे ​​जग वेडे आहे' असे लिहिले आहे, तर एका यूजरने मजेशीरपणे लिहिले आहे की, 'मला ही ट्रेन फक्त उचलावीशी वाटते'.