Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग...

Fight Video : राफ्टिंग दरम्यान जबर हाणामारी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तुफान हाणामारीत तरुणाने जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली, पुढे काय घडलं पाहा धक्कादायक व्हिडीओ

नेहा चौधरी | Updated: May 22, 2023, 10:34 AM IST
Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग... title=
Video of violent scuffle during Rishikesh river rafting goes viral Social Media Trending Now

Rafting Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राफ्टिंगदरम्यान गाईड आणि पर्यटकांमध्ये पॅडल घेऊन जबर हाणामारी करतानाचा हा धक्कादायक व्हिडीओ हैराण करणार आहे. सध्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे अनेक भारतीय सुट्टीची मजा घेण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जातात. ज्यामध्ये शिमला, कुल्लू मनाली, बद्रीनाथ आणि ऋषिकेश (Rishikesh News) या ठिकाणांना मोठी पसंती आहे. (Uttarakhand News)

ऋषिकेशमधील धक्कादायक व्हिडीओ 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता एका राफ्टिंग गाईडवर पॅडलने दे धपाधप मारताना दिसत आहे. त्या गाईडला आपला जीव वाचविण्यासाठी अखेर गंगेत (Ganga River) उडी मारावी लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. गंगेत उडी मारल्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथे असलेल्या इतर राफ्टर्सने त्याचा जीव वाचविण्यासाठी राफ्टमध्ये ओढून घेतलं. (Social Media Viral Video)  

हाणामारीमागील कारण काय?

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्यटक आणि गाइडवरील हिंसक हाणामारीचं कारण गो प्रो कॅमेरा होता. राफ्टिंग दरम्यान पर्यटक गंगेच्या लाटा आणि त्यातील त्यांनी केलेलं अॅडव्हेंचर कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गो प्रो कॅमेरा वापर केला जातो. सोशल मीडियावर हे व्हिडीओ टाकण्यासाठी पर्यटक गो प्रो कॅमेऱ्याची मागणी करतात. पर्यटकांची वाढती मागणी पाहून या ठिकाणाचे गाइड या गो प्रो कॅमेऱ्याचे अव्वा की सव्वा पैसे घेतात. त्यामुळे पर्यटक आणि या गाइडमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रुपांतरण हाणामारीत झालं असं म्हणतात. (Video of violent scuffle during Rishikesh river rafting goes viral Social Media Trending Now )

दरम्यान गंगा रिव्हर राफ्टिंग रोटेशन कमिटीचे अध्यक्ष दिनेश भट्ट पर्यटन विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा धक्कादायक व्हिडीओ ANI ने त्यांचा अधिकृत्य ट्वीटरवर अकाऊंटवर शेअर केला आहे. तरदुसरीकडे या प्रकरणाबाबत कोणत्याही बाजूने एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, अधिक शॉकिंग आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.