VIDEO : अशी रंगली राजकीय नेत्यांची होळी!

देशभरात नेत्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनीच रंगांची उधळण केलीय.

Updated: Mar 2, 2018, 03:57 PM IST
VIDEO : अशी रंगली राजकीय नेत्यांची होळी! title=

नवी दिल्ली : देशभरात नेत्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनीच रंगांची उधळण केलीय.

सिद्धू बीएसएफच्या मुख्यालयात

पंजाबच्या मंत्रिमंडळात मंत्री माजी क्रिकेटरपटू नवज्योतसिंह सिद्धू यांनी अमृतसरच्या बीएसएफच्या मुख्यालयात जाऊन होळी साजरी केली. पंजाबीतली अनेक उडती गाणीतर होतीच. विशेष म्हणजे बीएसएफच्या छावणीत सैराट गाण्यावर ठेका धरण्यात आला.

शिवराजसिंहांची गाण्यांची मैफल

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी भोपाळमधल्या आपल्या निवासस्थानी वेगळ्या पद्धतीनं होळी साजरी केली. शिवराजसिंह यांनी होळीनिमित्तानं गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मात्र यात कुणा गायकाला न बोलवता त्यांनी आपल्या पत्नीसोबत स्वत:च गाण्यांची मैफल सजवली

राजनाथ सिंह यांची होळी

राजकीय धामधूम बाजूला ठेवून आज नेतेमंडळी रंगांच्या उत्सवात सहभागी झालेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी रंग उधळून होळी साजरी केली. यावेळी ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. देशभरातल्या जनतेला रंगोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.