बॅंकांना माझ्याकडून पैसे घ्यायला पंतप्रधान का नाही सांगत ?, माल्ल्याचा प्रश्न

भारत येण्यासाठी घाबरत असलेला फरार दारू व्यावसायिक विजय माल्ल्याची बैचेनी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Updated: Feb 14, 2019, 09:30 AM IST
बॅंकांना माझ्याकडून पैसे घ्यायला पंतप्रधान का नाही सांगत ?, माल्ल्याचा प्रश्न  title=

नवी दिल्ली : भारत येण्यासाठी घाबरत असलेला फरार दारू व्यावसायिक विजय माल्ल्याची बैचेनी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. यामध्ये बॅंकानी माझ्याकडून पैसे घ्यावेत असे पंतप्रधान त्यांन का सांगत नाहीत ? असा प्रश्न विचारला आहे. गुरूवारी सकाळ सकाळ विजय माल्याने स्वत:च्या बचावासाठी एकामागोमाग एक असे चार ट्वीट केले.  

Image result for vijay mallya and modi zee news

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत विजय माल्याचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला होता. लोकसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावा दरम्यान ते बोलत होते. ''जे लोक देशातून पळाले आहेत, ते ट्वीटरवर रडत आहेत की मी तर 9 हजार कोटी रुपये घेऊन निघालो होतो पण मोदींनी माझे 13 हजार कोटी रुपये जप्त केले'' असा टोला पंतप्रधानांनी नाव न घेता माल्ल्याला लगावला होता. 

माल्ल्याने पंतप्रधान मोदी यांच्या टोल्यास ट्विटरवर उत्तर दिले आहे. तो म्हणतो, ''पंतप्रधानांच्या मागच्या भाषणाविषयी मला समजले. ते एक चांगले वक्ता आहेत. त्यांनी कोणाचे नाव न घेता म्हटले की एक व्यक्ती 9 हजार कोटी रुपये घेऊन पळाला आहे. त्यांचा इशारा माझ्याकडे होता. मी पूर्ण आदराने पंतप्रधानांना विचारू इच्छितो, की ती बॅंकानी माझ्याकडून घेण्यास ते का सांगत नाहीत ? यामुळे किमान पब्लिक फंडची रिकवरी होईल. मी कर्नाटक उच्च न्यायालयात सेटलमेंटची ऑफर याआधीच दिल्याचेही त्याने सांगितले. 

किंगफिशरचा मालक विजय माल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माल्याला भारतात पाठवण्यासाठी ब्रिटेनच्या गृहमंत्रालयाने याआधीच मंजूरी दिली आहे. 

Image result for vijay mallya zee news

माल्यावर बॅकांमधून साधारण 9,400 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात 17 बॅंकानी सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल केली. वाढलेल्या तेलाच्या किंमती, जास्त टॅक्स आणि खराब इंजिनमुळे त्यांच्या एअरलाईन्सला 6,107 कोटींचे नुकसान झाल्याचे माल्ल्याचे म्हणणे आहे. तरीही अजून तो 1800 कोटी रुपयांमध्ये अडकलेला आहे. पण काही बॅंक अद्यापही माल्याविरोधात न्यायालयात गेल्या नाही आहेत.