दिल्लीत पुन्हा हिंसक आंदोलन, पोलिसांवर दगडफेक आणि अनेक गाड्यांचं नुकसान

दिल्लीत पुन्हा आंदोलन हिंसक 

Updated: Dec 17, 2019, 05:35 PM IST
दिल्लीत पुन्हा हिंसक आंदोलन, पोलिसांवर दगडफेक आणि अनेक गाड्यांचं नुकसान title=

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जामियामध्ये पुन्हा एकदा हिंसक वातावरण निर्माण झालं आहे. दिल्लीच्या जाफराबादमध्ये ही हिंसक आंदोलन सुरु आहे. हजारों लोकं रस्त्यांवर घोषणाबाजी करत आहे. मोठ्या प्रमाणात येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुपारनंतर येथे लोकांची संख्या अचानक वाढली आहे. यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमणात बसेसची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

पोलीस अधिकारी आलोक कुमार यांनी म्हटलं की, 'आज दुपारी जाफराबादमध्ये जवळपास 2 हजार लोकं जमा झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. गाड्यांची तोडफोड केली. ज्यामध्ये 2 पोलीस जखमी झाले आहेत.'

जाफराबाद आणि सीलमपूरमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. तणाव पाहता 7 मेट्रोस्टेशन बंद करण्यात आले आहेत. दिल्ली गेटवर जाणारे रस्ते जाम झाले आहेत. 

जामियामध्ये झालेल्या हिंसेमुळे पोलिसांनी 10 लोकांना अटक केली आहे. यामध्ये एकही आरोपी हा विद्यार्थी नाही आहे. हे सगळे लोकं गुन्हेगार पार्श्वभूमीचे आहेत. ज्य़ामध्ये 3 जण हे बॅड कॅरेक्टर म्हणून घोषित आहेत.