viral: गब्बर आहे तरी कोण? मालकाचा जीव वाचवण्यासाठी सापाशी भिडला पण स्वतःच्या जीवाला मुकला

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Updated: Nov 17, 2022, 01:05 PM IST
viral: गब्बर आहे तरी कोण? मालकाचा जीव वाचवण्यासाठी सापाशी भिडला पण स्वतःच्या जीवाला मुकला title=

Viral news: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे  शेअरसुद्धा होत आहे. कुत्रा एक असा पाळीव प्राणी आहे जो लवकर  माणसाळतो  म्हटलं जात.

एकदा का त्याला मालक भेटला कि त्याच्यासोबत इमानेइतबारे तो राहतो अशी अनेक उदाहरणं आपण पहिली आहेत. 

आणखी वाचा: trending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच..

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ जर आपण पाहिला, तर एका कुत्र्याने आपल्या मालकांसाठी कश्या प्रकारे जीवाची बाजी लावतो हे पाहायला मिळेल. गब्बर नावाचा हा कुत्रा आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी विषारी सापासोबत असा काही भिडला कि पाहताना आपल्याही

अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.. हा इमानदार कुत्रा आपल्या मालकाला वाचवण्यासाठी दुनियेतील सर्वात विषारी साप रसेल व्हायपर सोबत भिडला. त्याचसोबत शेवटच्या श्वासापर्यंत तो लढला अखेर त्याने स्वतःचे प्राण त्यागले. 

गब्बरचा मालक त्याच्यासोबत फेरफटका मारत होता त्याचवेळी  सापाने त्याच्यावर हल्ला केला, मात्र तेव्हाच गब्बरने सापाला पकडले आणि नंतर तो मालकापासून दूर घेऊन गेला . कुत्रा आणि साप यांच्यात जोरदार भांडण झाले.

सापाला मारल्यानंतर गब्बर जमिनीवर पडला. या भांडणात दोघांचा मृत्यू झाला आहे.