साप-मुंगुसाच्या थरारक झुंजीचा व्हिडिओ व्हायरल

मुंगूस आणि नाग समोरासमोर येऊन ठाकले. दोघांमध्ये सुरू झाला जीवघेणा संघर्ष. नाग समोर दिसताच चिडलेल्या मुंगुसानं नागावर जोरदार हल्ला करायला सुरूवात केली. 

Updated: May 4, 2022, 11:09 PM IST
साप-मुंगुसाच्या थरारक झुंजीचा व्हिडिओ व्हायरल title=
फाईल फोटो

मुंबई :  नाग आणि मुंगूसाच्या लढाईचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत नाग मुंगूसाला भिडतोय. मग दोघांच्या भांडणात पुढे काय झालं पाहुयात. नाग आणि मुंगूस या दोघांचं विळ्या भोपळ्याचं नातं. हे दोघे समोरा समोर आले तर काय होतं ते या व्हिडिओतून बघा. (mongoose and snake who will win see viral video)

मुंगूस आणि नाग समोरासमोर येऊन ठाकले. दोघांमध्ये सुरू झाला जीवघेणा संघर्ष. नाग समोर दिसताच चिडलेल्या मुंगुसानं नागावर जोरदार हल्ला करायला सुरूवात केली. 

मुंगुसाचं रौद्ररुप पाहून नागही बिथरला. त्यानेही आपल्या बचावासाठी हल्ल्याचा प्रयत्न केला. पण, मुंगूस वारंवार हल्ला करत असल्याने मग नाग मुंगूसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला. विषारी नाग मुंगूसावर हल्ला करत होता. तरीदेखील मुंगूस या नागाला मारण्याचा प्रयत्न करतच होता. 

मुंगुसानं हल्ला केल्यानंतर नागानं त्याला चांगलाच झटका दिला. पण, यात नाग यशस्वी होऊ शकला नाही. नाग मुंगुसाला मारण्याचा प्रयत्नात होता. पण, आक्रमक झालेलं मुंगूस नागावर जोरदार पलटवार करतच होता. आता या व्हिडिओत बघा, कसा हा मुंगूस नागावर हल्ला करतोय. 

नाग या मुंगुसाच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वारंवार हल्ला करून मुंगूसानं या नागाला जखमी केलं. अखेर हा नाग बिळात शिरला आणि या मुंगूसाच्या तावडीतून सुटला.