भर मंडपात नववधू आणि नवरदेवासोबत घडला असा प्रकार, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खरंतर हा व्हिडीओ वेगवेगळ्या लग्नातील त्या विचित्र किंवा मजेदार क्षणांचा आहे. जे लोकांचं मनोरंजन करत आहेत. 

Updated: May 26, 2022, 09:19 PM IST
भर मंडपात नववधू आणि नवरदेवासोबत घडला असा प्रकार, पाहून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : इंटरनेटवर आपल्याला लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे खूपच मनेरंजक असतात. यांपैकी काही व्हिडीओ हे मजेदार असतात, तर काही व्हिडीओ हे अतिशय भावनीक क्षणांचे असतात. लग्न म्हटलं की, मजा, मस्करी ही होतच असते. तसेच यामध्ये रुसवे फुगवे देखील येतात.

ऐवढंच काय तर असं अनेक लग्नात घडलं आहे की, नववधू आणि नवरदेव हे आपापसात देखील स्टेजवर भांडतात. ज्यामुळे त्यांच्या या घटनांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सर्वांनाच पोट धरुन हसायला लावत आहे.

खरंतर हा व्हिडीओ वेगवेगळ्या लग्नातील त्या विचित्र किंवा मजेदार क्षणांचा आहे. जे लोकांचं मनोरंजन करत आहेत.

या व्हिडीओत कधी नववधू आणि नवरदेव भांडत आहेत. तर कधी त्यांच्यासोबत अशी घटना घडते जी फारच विचित्र आहे.

या लग्नाच्या व्हिडीओमध्ये ज्या प्रकारचा नजारा पाहायला मिळत आहे, तो सहसा पाहायला मिळत नाही. न्यूज ट्यूब इंडिया नावाच्या यूट्यूब चॅनलवर वधू-वरांचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे. लोक या व्हिडीओवरती कमेंट्स आणि लाईक्स करत आहेत.