गायीच्या वासराला महिलेने गाडीत बसवलं, सीट बेल्ट लावला आणि... पाहा व्हायरल व्हिडीओ

ही महिला आधी स्वत: कॅमेरा घेते. त्यानंतर गाडीच्या सीटवर बसलेला बछडा दाखवते, ज्याने सीट बेल्टही बांधलेले आहे

Updated: Feb 9, 2022, 03:14 PM IST
गायीच्या वासराला महिलेने गाडीत बसवलं, सीट बेल्ट लावला आणि...  पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की अनेक लोक त्यांच्या कुत्र्यांना किंवा मांजरींना आपल्या गाडीमधून फिरायला घेऊन जाता. ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या गाडीच्या खिडकीतून कुत्र्याला डोकावताना तुम्ही पाहिले असेल. लोकांना कुत्र्याचं असं आयुष्य जगण्याबाबत कुतुहल वाटतं आणि आपण या गोंडस प्राण्यांच्या प्रेमात पडतो. परंतु तुम्हाला आज आम्ही अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत. ती व्यक्ती आपल्या गाडीतून कुत्रा मांजर नाही, तर दुसऱ्याच प्राण्याला घेऊन जात आहे.

या घटनेचे फोटो व्हायरल होताच, सर्वत्र एकच चर्चा होऊ लागली. या 24 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक महिला कारच्या ड्रायव्हिंग सिटवर बसून व्हिडीओ शूट करत आहे.

ही महिला आधी स्वत: कॅमेरा घेते. त्यानंतर गाडीच्या सीटवर बसलेला बछडा दाखवते, ज्याने सीट बेल्टही बांधलेले आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कॅमेऱ्याकडेही इतक्या प्रेमाने पाहतो की लोक त्याच्या निरागसतेचे चाहते झाले आहेत!

ही क्लिप आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. @aarv_8008 नावाच्या युजरने ८ फेब्रुवारी रोजी हे ट्विटरवर शेअर केले होते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - 2022 चा सर्वात सुंदर व्हिडिओ!

या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि रिट्विट्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहीजण त्यावर 'राधे-राधे' लिहित आहेत, तर काहीजण याला अतिशय गोंडस क्षण म्हणत आहेत.