शिकारीला गेलेल्या आईला जेव्हा कळतं की, तिच्या बाळाचीच शिकार झाली... व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होणारा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. हा एका सिंहीणीचा व्हिडीओ आहे. 

Updated: Mar 30, 2022, 08:25 PM IST
शिकारीला गेलेल्या आईला जेव्हा कळतं की, तिच्या बाळाचीच शिकार झाली... व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडिया हे आपल्याला जगातील प्रत्येक भागातील लोकांबद्दल माहिती देत असतं. प्राणीमात्रांचं देखील आपलं एक वेगळ विश्व आहे. परंतु तरी देखील आपल्याला सोशल मीडियामुळे या सर्व गोष्टींची माहिती मिळते. येथे तुम्हाला प्राण्यांशी संबंधीत वेगवेगळ्या घटने फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतील, हे व्हिडीओ फारच मनोरंजक असतात. तसेच ते आपल्याला माहिती देखील पूरवतात. आपल्याला सोशल मीडियामुळे कुठे काय सुरु आहे या गोष्टीची माहिती मिळते.

आपल्याला जंगलातील प्राण्यांच्या व्हिडीओमुळे बऱ्याचदा त्यांची वागणूक लक्षात येते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचं देखील तसंच आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणार आहे. हा एका सिंहीणीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये ती आपल्या बाळासाठी शोक आणि राग दोन्ही एकाच वेळेला व्यक्त करताना दिसत आहे.

खरेतर ही सिंहीण आपल्या मुलांना सोडून त्यांचं पोट भरण्यासाठी शिकारीला गेली होती. परंतु जेव्हा ती पुन्हा आली तेव्हा मात्र तिला आपली मुलं दिसली नाहीत. तेव्हा ती त्यांना वेड्यासारखी शोधू लागली.

थोडं पुढे जाऊन या सिंहीणीला आपलं छावा जमीनीवर पडलेला दिसतो. तेव्हा ती धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करु लागली. परंतु तो काही उठत नव्हता. त्यानंतर तिने छाव्याचा वास घेतला आणि त्याला पुन्हा हलवलं. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. आता त्या आईला कळून चूकलं होतं की, तिचं बाळ या जगात नाही.

ज्यानंतर ही सिंहीण आक्रमक होते आणि जिवाच्या आकांताने ओरडते. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेवटी आईच ती तिचं काळीज आपल्या बाळासाठी तुटणारच. आपल्या बाळांचं पोट भरण्यासाठी ती निघून गेली होती, पणं तिला कुठे माहित होतं की, तिच्या मागे तिच्या बाळाचीच शिकार होईल.

या संपूर्ण घटनेने जंगलात तेथे उपस्थीत असलेले जिरफ देखील सुन्न झाले. जणू ते एका आईच्या दुखात सहभागी आहेत.