'एक चूक आणि खेळ खल्लास'... बाईक स्टंट करताना तरुणाची जिरली मस्ती, पाहा व्हायरल व्हिडीओ

आज-कालच्या तरुण लोकांमध्ये स्टंटचा क्रेज वाढला आहे,

Updated: Oct 1, 2021, 06:56 PM IST
'एक चूक आणि खेळ खल्लास'... बाईक स्टंट करताना तरुणाची जिरली मस्ती, पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : आजची तरुण मंडळी काहीतरी वेगळं करण्यासाठी धडपड करत असतात. खरेतर सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे सगळ्यांना आपल्याकडील टॅलेंटला सोशल मीडियावरती शेअर करत असतात. हे सगळं ते प्रसिद्धीसाठी करत असतात कारण जेवढे जास्त व्ह्यूव्ह किंवा लाईक्स तितके जास्त तुम्ही प्रसिद्ध होता, ज्यामुळे लोकं काहीही करण्याची संधी सोडत नाही.

तसेच आज-कालच्या तरुण लोकांमध्ये स्टंटचा क्रेज वाढला आहे, तरुण वयोगटातील मुलं बाईक सोबत वेगवेगळे स्टंट करतच असतात. काही तरुण स्टंट करण्याला मस्करीत घेतात परंतु ते त्यांना महागात पडू शकतो, यामुळे त्यांचा जिव देखील जाऊ शकतो. त्यात आता सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती विचित्र स्टंट करत आहे. तो महामार्गावर बाईक चालवत आहे, परंतु तो तरुण ही बाईक बसून नाही तर उभा राहून चालवत आहे, त्यानंतर या तरुणासोबत काय घडलं तुम्हीच पाहा.

हा तरुण बाईक चालवताना, बाईकला वर उचलतो, जे खरोखरच धोक्याचे आहे, परंतु एवढ्यावरच न थांबता हा तरुण पुढे बाईकवरती उभा राहातो, तर कधी हात सोडतो, तर कधी सीटवरून बाजूला पाय टाकतो आणि शेवटी स्टाइल मारण्याच्या प्रक्रियेत बाईकवरून उतरतो आणि बाजूने चालायला लागतो. त्यानंतर त्याचे संतुलन बिघडते आणि तो दुचाकीसह खाली पडतो.

हा व्हिडीओ पाहून एखाद्या व्यक्तीच्या धाडसाचे कौतुक करावे की, अशा धोकादायक कृती केल्याबद्दल त्याच्या मूर्खपणावर हसणे हे लोकांना समजत नाही. एका वापरकर्त्यावर कमेंट करताना लिहिले, 'असे स्टंट करण्यापूर्वी आपण खूप सराव केला पाहिजे.' दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले केली की 'पुढच्या वेळी स्टंट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकं सोशल मीडियावर या व्यक्तीच्या या स्टंटच्या व्हिडीओला नुसतं लाईकच करत नाही तर, त्याला शेअर आणि कमेंट देखील करत आहेत.