दुकानात मित्रांशी गप्पा मारत होता व्यक्ती, अचानक खिशात झाला मोबाईलचा स्फोट... पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईल शॉपच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसत आहे.

Updated: Sep 6, 2021, 01:56 PM IST
दुकानात मित्रांशी गप्पा मारत होता व्यक्ती, अचानक खिशात झाला मोबाईलचा स्फोट... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आपण मोबाईल बऱ्याचदा आपल्या खिशात ठेवतो. अनेक पुरुषांना शर्टाच्या वरच्या बाजूला खिशा असतो, त्यामुळे ते त्या वरच्या खिशात देखील बऱ्याचदा आपला मोबाईल ठेवतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की मोबाईल वरच्या खिशात ठेवणे तुमच्यासाठी किती धोक्याचे ठरु शकते. मोबाईलचे रेडियेशन आपल्या हृदयाला हानी पोहोचवू शकते. एवढेच नाही तर इयरफोनशिवाय मोबाईलवर बराच वेळ बोलल्याने देखील आपले नुकसान होऊ शकते.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती दुकानात बसली आहे आणि त्यानंतर त्याच्या खिशात ठेवलेल्या फोनमधून अचानक धूर निघू लागतो.

मोबाईल शॉपमध्ये अचानक घडली घटना

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोबाईल शॉपच्या दुकानात बसून गप्पा मारताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही लोक उभे आहेत. विनोदी मूडमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीसोबत काही सेकंदात त्याच्यासोबत एखादी घटना घडणार आहे, याची कल्पनाही नसते.

व्हायरल झालेला या 15 सेकंदांचा व्हिडीओ तुम्ही निट पाहिले तर, तुम्हाला समजेल की, पांढऱ्या शर्टमध्ये दुकानदारांसमोर बसलेल्या व्यक्तीच्या शर्टच्या खिशातून अचानक धूर निघू लागतो.

मोबाईलमधून धूर निघताना पाहून हा व्यक्तीची खूप घाबरतो आणि तो लगेच मोबाईलला खिशातून बाहेर काढून जमिनीवर फेकतो. एवढेच नाही तर त्याच्या जवळ उभी असलेली व्यक्ती देखील खूप घाबरून जाते आणि दुकानाबाहेर पळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ Our Vadodara नावाच्या अकाउंटवरुन यूट्यूबवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ 64 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 336 हजार लोकांनी त्याला लाईक्स देखील केले आहे. लोक या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. मोबाईल खिशात ठेवणे किती धोकादायक ठरु शकते हे काही लोकांनी शेअर केले आहे.