viral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला

आपण सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नकला करण्यात पोपट एक्सपर्ट असतो.

Updated: Nov 10, 2022, 02:24 PM IST
viral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला  title=

viral parrot barking like dog video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय तो पाहून आतापर्यंत भरायचं कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत  बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा केला आहे. 

तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तर तुमच्याही चेहऱ्यावर क्युट स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. 

आणखी वाचा: Viral: बाईकच्या चाकात फसला माकड..बचावाचा थरारक video समोर..येईल अंगावर काटा !

पाळीव प्रांत्यांपैकी बऱ्याच  दिसणारा प्राणी म्हणजे कुत्रा. सर्वात इमानदार आणि विश्वासू पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याकडे पाहिलं जात. कुत्रा हा प्राणी माणूसलोभी असतो तो लगेच माणसाळतो.. इतर प्राण्यांसोबतची त्याची लवकर गट्टी जमते.  आणि याच गट्टीच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 

आपण जेव्हा आपल्या एखाद्या मित्रांसोबत राहतो आणित्याच्यासारखी एखादी गोष्ट करतो जी आपल्या पॅरेंट्सना आवडत नाहितेव्हा आपले आई वडील आपल्याला एक ठरलेला टोमणा मारतात. ''वाण नाहीतर गुण  लागलाच''...  

सध्या सोशल मीडियावर एक पोपट आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (parrot and dog viral video on social media) या व्हिडिओतसुद्धा असच काहीस घडलं आहे.  कुत्र्यासोबतच्या मैत्रीचा चांगलाच परिणाम पोपटावर झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

आपण सर्वाना हे तर माहीतच आहे, पोपट हा पक्षी आपण सांगू तस बोलू शकतो. आपण जर शिकवलं तर उत्तमरीत्या बोलतो. दुसऱ्यांच्या बोलण्याची नाकाला करण्यात पोपट एक्सपर्ट असतो. म्हणूनच तर एखादा कोणी खूप बोलत असेल तर आपण म्हणतो ना कि पोपटासारखा बोलू नको .. 

नेमका काय प्रकार 

व्हिडीओ नीट ऐका, आणि पाहा..यात एक कुत्रा झोपलाय आणि पोपट त्याच्या अवतीभवती फिरतोय त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला उठवताना पोपट चक्क कुत्र्यासारखा भुंकतोय.ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही पण दोघांची मैत्री फारच खास दिसतेय हे 
नक्की.