Video : Mahindra Thar आणि Tata Nanoची जोरदार धडक; अशी झाली गाड्यांची अवस्था

Thar vs Nano : छत्तीसगडमध्ये झालेल्या या अपघातापेक्षा गाडीची अवस्था पाहून अनेकांचे डोक्याला हात लावला आहे. या अपघाताचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Updated: Feb 19, 2023, 06:17 PM IST
Video : Mahindra Thar आणि Tata Nanoची जोरदार धडक; अशी झाली गाड्यांची अवस्था title=

Viral Video : महिंद्राची थार (Mahindra Thar) या गाडीने गेल्या वर्षभरात कमालीची लोकप्रियता मिळवलेली आहे. महिंद्रा थार हे एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील सर्वात मजबूत गाडी मानली जाते. तरुणांमध्ये या गाडीची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. 'ऑफ रोड' प्रवासासाठी ही गाडी अनेकदा वापरली जाते. मात्र सध्या देशभरात रस्त्यावर अनेक महिंद्रा थार गाड्या फिरताना दिसत असतात. दुसरीकडे, काही वर्षापूर्वीने टाटाने (TATA) बाजारात आणलेली देशातील सर्वात स्वस्त आणि मस्त टाटा नॅनो (Tata Nano) कारही अनेकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे ही कार कमकुवत मानली जात होती. मात्र सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात ही गाडी बाजारात आली होती.

आता या दोन गाड्यांचे फिचर आम्ही का सांगतोय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याला कारणही तसेच आहे. तुम्हाला या दोन्ही गाड्यांमध्ये मजबूत गाडी कोणती असा प्रश्न विचारला तर तुम्हीसुद्धा महिंद्रा धार असेच उत्तर द्याल. पण तुम्ही काही प्रमाणात चुकताय असं म्हणायला हरकत नाही. त्याला कारणही तसंच आहे. छत्तीगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका रस्त्यावर महिंद्रा थार आणि टाटा नॅनोची धडक झाली. या अपघातानंतर अनेकांचे डोळे उघडेच राहिले आहेत.

दुर्ग जिल्ह्यातील पद्मनाभपूर येथील मिनी स्टेडियम चौकात हा सर्व प्रकार घडला. वेगात असलेल्या महिंद्रा थारची समोरुन येणाऱ्या टाटा नॅनोला धडक बसली. मात्र या धडकेत थार उलटली, तर नॅनोला मोठी हानी झाली नाही. नॅनोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. मात्र टाटा नॅनोमध्ये इंजिन मागील बाजूस बसवलेले असल्याने त्याचा फारसा फटका बसला नाही. यावरुन आता कोणती गाडी अजित मजबूत आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

अशी होती टाटा नॅनोची अवस्था

tata na

पाहा थारची अवस्था

thar

दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. अपघातग्रस्त थार ही नवीकोरी होती. या गाडीवर नंबर प्लेटही नव्हती. तर नॅनोही नवीन वाटत नव्हती.