Viral Video : कारमधून ड्रायव्हर फूटबॉलसारखा उडाला, अपघातात कारचे तुकडे तुकडे

कारमधला ड्रायव्हर कारची काच फोडून फूटबॉलसारखा बाहेर उडाला.   

Updated: Oct 22, 2022, 11:10 PM IST
Viral Video : कारमधून ड्रायव्हर फूटबॉलसारखा उडाला, अपघातात कारचे तुकडे तुकडे title=

Viral Video : बातमी आहे एका भयानक अपघाताची. रस्ता खाली होता, म्हणून कार चालक वेगानं कार दामटवत होता. कार टोल प्लाझावर पोहोचताच याचं नियंत्रण सुटलं. कार थांबवता थांबवता ड्रायव्हरच्या नाकीनऊ आले. ही कार टोल प्लाझाला जाऊन जोरात धडकली. पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही कारमध्ये बसताना विचार कराल असं काय घडलं. चला पाहुयात. (viral video toll naka accident video viral on social media)

तुमच्या हृदयाचा ठोका चुकवणारा कारचा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय. हा अपघात पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधला ड्रायव्हर कारची काच फोडून फूटबॉलसारखा बाहेर उडाला. आता हा व्हिडिओ पाहा. टोल प्लाझाजवळील रस्ता सुनसान होता. त्यावेळी भरधाव वेगानं हा कार चालक चालला होता. याचा वेग बघा. ट्रोल प्लाझाजवळ आला तरी याने वेगावर नियंत्रण आणलं नाही. टोलवर येऊन हा जोरात धडकला. ही धडक इतकी भयंकर होती, की याच्या कारचे तुकडे कुठल्या कुठे उडाले. 

हा ड्रायव्हर कारची काच फुटून चेंडूसारखा उडाला. किती भयानक दुर्घटना घडलीय. ड्रायव्हर जागच्या जागीच मृत्यूमुखी पडला. या अपघातानंतर कारनं पेट घेतलाय. हा अपघात वेगावरील नियंत्रण सुटल्याने झालाय. नशीब इथे गाड्या नव्हत्या म्हणून मोठी दुर्घटना टळली नाहीतर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. तुमची चूक दुस-याच्याही जीवावर बेतू शकते.