Vodafone Idea कंपनीचं नाव आता Vi ('वूई)', लोगोही बदलला

आता नव्या 'Vi' (वूई) नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीचं नाव, लोगो - ब्रॅण्ड बदलण्यात आले आहेत.

Updated: Sep 7, 2020, 04:23 PM IST
Vodafone Idea कंपनीचं नाव आता Vi ('वूई)', लोगोही बदलला title=

मुंबई  : टेलिकॉम कंपनी Vodafone Idea आता नव्या 'Vi' (वूई) नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीचं नाव, लोगो - ब्रॅण्ड बदलण्यात आले आहेत. कंपनीने सोमवारी ही रिब्रॅन्डिंगची घोषणा केली. कंपनीचं नवं ब्रॅन्डचं नाव असणार आहे, . कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आपण याला  'We'असं वाचू शकतो. दोन्ही ब्रॅन्डचं इंटीग्रेशन टेलिकॉम जगतातील सर्वात मोठी एकीकरण आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

वोडाफोन आयडियाचे एमडी आणि सीईओ रविंद्र ठक्कर यांनी नव्या ब्रॅन्डला लॉन्च करताना सांगितलं, वोडाफोन-आयडिया मर्जर २ वर्ष आधी करण्यात आलं होतं. आम्ही तेव्हापासून दोन मोठे नेटवर्क, आमची टीम आणि प्रोसेस एकत्र करण्याचं काम करत होतो, आज ब्रँन्ड सादर करताना मला खूप आनंद होत आहे, भारतीय आशावादी आहेत, जीवनात पुढेच पाऊल टाकू इच्छितात.

रविंद्र ठक्कर यांनी सांगितलं की, कंपनी मोबाईल प्लानच्या किंमतीत वाढ करणार आहे. नवीन प्लानमध्ये वाढ केल्यास ARPU सुधारण्यास मदत होईल.