लग्नात नवरीला उचलण्यासाठी भाऊ येताचं नवरदेवाने असं काही की....

नवरदेवाचं असं रूप पाहाताचं नवरीच्या भावांनी घेतली माघार 

Updated: Sep 1, 2021, 08:38 AM IST
लग्नात नवरीला उचलण्यासाठी भाऊ येताचं नवरदेवाने असं काही की.... title=

मुंबई : आज प्रत्येक जण आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर करत असतात. आयुष्यात सर्वात महत्त्वाचा क्षण असतो तो म्हणजे लग्न. लग्नातील प्रत्येक विधीचं एक वेगळ महत्त्व असतं. शिवाय विधी  पार पाडत असताना अनेक गंमती-जमती देखील पाहायला मिळतात. लग्न कार्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडिओमध्ये नवरी नवरदेवाला वरमाळा घालण्यासाठी उठते, तेव्हा तिचे भाऊ तिला उचलण्यासाठी स्टेजवर येतात. पण नवदेवाचा असा रूप पाहून ते दूर होतात. जेव्हा नवरीचे दोन भाऊ बहिणीला उचलण्यासाठी येतात, तेव्हा नवरदेवर गुडघ्यांवर बसतो आणि त्यानंतर नवरी नवरदेवाला सहज हार घालते. सध्या नव्या जोडप्याचा हा रोमांटिक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akki (@_akki__143_)

या व्हिडिओला अतापर्यंत 1 लाख 88 नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शिवाय नव्या जोडप्याच्या या व्हिडिओवर अनेकांच्या  कमेन्टचा पाऊस पडत आहे.