नवरदेवाने नववधुसमोर असं काही केलं की, त्याला सगळ्यांसमोर झुकवावी लागली मान

नवरदेवाचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल 

Updated: Aug 12, 2021, 03:05 PM IST
नवरदेवाने नववधुसमोर असं काही केलं की, त्याला सगळ्यांसमोर झुकवावी लागली मान  title=

मुंबई : आपल्या लग्नात प्रत्येकाला पारंपरिक पोशाखात राहायचं असतं. नववधु आणि नवरदेव लग्नात अतिशय खास अशा पारंपरिक वेशात राहणं पसंत करतात. अशाच एका लग्नात नवरदेव राजाच्या पोशाखात दिसत आहे तर नववधु महाराणीच्या पोशाखात दिसत आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नवं दाम्पत्य या पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहेत. 

या व्हिडीओत नवरदेवाने असं काही केलंय की, सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नवरदेवाने नववधु स्टेजवर येताच एक अशी गोष्ट केली ज्यामुळे सगळेच चकीत झाले. हार घालताना नवरदेव चक्क नववधुसमोर गुडघ्यावर बसतो. आणि नववधुसमोर मान खाली घालतो. हे बघून सगळेच थक्क झाले. एवढं नव्हे तर यामुळे नववधु खूप खूष झाली. 

नवरदेवाची ही गोष्ट सगळ्यांनाच भावली आपण अनेकदा लग्नात पाहिलं असेल हार घालण्याच्या विधीला नवरदेव आणि नववधुला उचलून घेतलं जातं. पण या लग्नात मात्र तसं घडलं नाही. नवरदेव चक्क आपल्या गुडघ्यावर बसून खाली वाकून नववधुसमोर राहिला. हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.