WhatsApp Down मग ‘या’ 5 ॲप्सवरून करा मेसेज

व्हॉटस ॲप वापरायची सवय झालेल्या नागरिकांची ऐन दिवाळीत सणात अडचण झाली होती.

Updated: Oct 25, 2022, 04:35 PM IST
WhatsApp Down  मग ‘या’ 5  ॲप्सवरून करा मेसेज title=

WhatsApp भारतातील सर्वोत्तम पर्याय: WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय चॅटिंग अॅप्सपैकी एक आहे. हेच अॅप्स गेल्या दोन तासापासून भारतातील व्हॉट्‌स ॲप (WhatsApp) डाऊनमुळे बंद झाले होते. त्यामुळे संवादाचे मोठे साधन बंद पडल्यामुळे युजर्सकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. पण आता WhatsApp डाऊन झाले तरी तुम्ही दुसरे चॅटिंग अॅप वापरू शकता...

काही काळापूर्वी व्हॉट्सअॅप सुमारे दोन तास डाऊन झाले होते. त्यामुळे अॅपवर कोणतेही संदेश येत नव्हते किंवा कोणतेही संदेश पाठवले जात नव्हते. दरम्यान, अनेकांना खूप त्रासही सहन करावा लागला. आता व्हॉट्सअॅपऐवजी इतर कोणते अॅप्स आहेत, जे तुम्ही वापरू शकता याबद्दल बोलूया.

- हे Signal अॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते. ते व्हॉट्सअॅप सारखे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देखील प्रदान करत आहे आणि हे अॅप विनामूल्य वापरले जाऊ शकते.

- व्हॉट्सअॅपची थेट स्पर्धा असलेल्या telegram अॅप iOS आणि Android या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवरही काम करते. हे 500 दशलक्षाहून अधिक लोक वापरतात आणि व्हॉट्सअॅपचे सर्व फीचर्स आणि इतर अनेक फीचर्सही यामध्ये देण्यात येत आहेत.

- JIO Chat हे भारतीय चॅटिंग अॅप देखील खूप उपयुक्त आहे परंतु केवळ Jio वापरकर्ते ते वापरू शकतात. हे अॅप विनामूल्य वापरले जाऊ शकते आणि आपण या अॅपद्वारे आपल्या जिओ संपर्कांच्या संपर्कात राहू शकता.

- 400 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते असलेल्या Share Chat या अॅपमध्ये खाजगी संदेशवहन सारखी अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत आणि ती सहजपणे वापरली जाऊ शकतात.

- मेटा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे मेसेजिंग (facebook messenger ) अॅप, फेसबुक मेसेंजर चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि व्हॉईस कॉलिंगसाठी देखील वापरले जाऊ शकते. हे देखील एक विनामूल्य अॅप आहे आणि वापरण्यास अतिशय सोपे आहे.