जेव्हा रस्त्यावर नाचणाऱ्या मुलांमध्ये पोलिसांची होते एन्ट्री आणि... पुढे काय घडतं पाहा व्हायरल व्हिडीओ

 ठरावीक वेळे नंतर गाणं किंवा म्यूझीक सुरू ठेवलं की, पोलिसांची एन्ट्री होतेच आणि ते हे सगळं बंद करायला लावतात.

Updated: Mar 11, 2022, 07:58 PM IST
जेव्हा रस्त्यावर नाचणाऱ्या मुलांमध्ये पोलिसांची होते एन्ट्री आणि... पुढे काय घडतं पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : आपण भारतीय अनंद साजरा करताना कशाचाही विचार करत नाही. जे मनाला वाटतं, त्याप्रमाणे आपण आयुष्य जगतो. त्यात लग्नकार्य म्हटलं की, आपण कधीच शांत राहात नाही. त्यात मजा, मस्करी आणि डान्स हे सगळं येतंच. तुम्हाला हे माहित असेल की बऱ्याचदा काही नियमांचे उल्लंघन झाले किंवा रात्रीच्या ठरावीक वेळे नंतर गाणं किंवा म्यूझीक सुरू ठेवलं की, पोलिसांची एन्ट्री होतेच आणि ते हे सगळं बंद करायला लावतात. अशीच काहीशी घटना एका कॅमेरात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जो पाहून तुम्हाला हसून हसून पोटत दुखेल, परंतु तुमचं हसणं काही थांबणार नाही.

खरेतर या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरती काही मुलं डान्स करत असतात. तेवढ्यात तेथे पोलिसांची एन्ट्री होते. जे पाहाताच एक व्यक्ती त्या पोलिसांसोबत जे करतो, ते फारच धक्कादायक आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पोलिसांना पाहताच एक मुलगा पुढे येतो आणि तो पोलिसांना किस्स करायला सुरुवात करतो. या मुलाच्या या कृत्याने तो पोलीस चिडतो. परंतु त्या मुलाला काहीही वाटत नाही आणि तो याकडे दुर्लक्ष करुन पुन्हा नाचू लागतो. या मुलाचं धाडस पाहून सर्वच लोकांना धक्का बसला आहे आणि लोकांना प्रश्न पडला आहे की, या मुलाचं नंतर काय झालं असावं याचा आपण विचार देखील करु शकत नाही.

हा व्हिडिओ memecentral.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले आहे, 'आत्ताची मुलं', तर  दुसऱ्या यूजरने लिहिले, 'लग्नाविना सासरची हवा खा.' व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटिझन्स अशाच मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.