Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर

Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 11, 2024, 07:00 PM IST
Loksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर title=
Arvind kejriwal PM modi jp nadda

JP Nadda On Arvind kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी कथित मद्य धारण घोटाळ्याप्रकरणी जामीर मिळताच आता केजरीवालांनी भाजरवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर (PM modi) सडकून टीका केलीय..मोदी सत्तेत आले तर उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जींनी जेलमध्ये टाकतील, असं भाकित केजरीवालांनी वर्तवलंय. मोदी जिंकले तर उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील असंही केजरीवाल म्हणालेत. तर मोदीनंतर पंतप्रधान म्हणून चेहरा कोण? असा सवाल केजरीवाल यांनी यावेळी विचारला त्यावरून आता भाजप अस्वस्थ झाल्याचं चित्र समोर येत आहे. त्यावर आता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी उत्तर दिलंय. 'मोदीजींच्या नेतृत्वाखाली 'विकसित भारत'ची संकल्पना साकार होत आहे आणि पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळात मोदीजी देशाला नव्या उंचीवर नेतील', असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी म्हटलं आहे.

नेमकं जे पी नड्डा काय म्हणाले?

निवडणुकीतील अपयश लक्षात आल्यानंतर केजरीवाल आणि संपूर्ण भारत आघाडी अस्वस्थ आहे. देशाची दिशाभूल करणं आणि गोंधळ घालणं हा त्यांचा उद्देश आहे. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मोदीजींना जनतेचे अतोनात आशीर्वाद मिळत आहेत. पंतप्रधानांसमोर त्यांच्याकडे ना कुठलं धोरण आहे ना कुठला कार्यक्रम. आता ते मोदीजींच्या वयाची सबब पुढे करून मार्ग काढत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या घटनेत कुठेही वयाची अशी तरतूद नाही. मोदीजींचा प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित आहे हे जनतेला माहीत आहे, असं जे पी नड्डा यांनी म्हटंल आहे. 

विरोधकांनी जास्त खूश होऊ नये, कोणी मोगल होऊ नये. नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत आणि भविष्यातही आमचे नेतृत्व करत राहतील. INDIA युती आणि तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या नेत्यालाही माहीत आहे की "जर मोदी येतील, मोदीच राहतील, फक्त मोदीच भारत मजबूत करतील.", असं जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे.

अमित शहा म्हणतात...

मी अरविंद केजरीवाल आणि कंपनी आणि इंडिया आघाडीला हे सांगू इच्छितो की भाजपच्या घटनेत असं काहीही नमूद केलेलं नाही. पंतप्रधान मोदी फक्त हा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत आणि पंतप्रधान मोदी भविष्यात देशाचे नेतृत्व करत राहतील, असं अमित शहा म्हणाले आहेत.