मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

Toilet Interesting Fact: तुम्ही हॉटेल्स (Hotels), सिनेमागृह (Theatre) आणि मॉलमध्ये (Shopping Mall) नक्कीच गेला असाल. या ठिकाणी टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ आली असेल, तर एक गोष्ट तुम्हाला खटकली असेल. ती म्हणजे टॉयलेटचे (Toilet) दरवाजे खालून उघडे का असतात? 

Updated: Dec 28, 2022, 03:24 PM IST
मॉलमधील टॉयलेटचे दरवाजे खालून उघडे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण title=

Toilet Interesting Fact: तुम्ही हॉटेल्स (Hotels), सिनेमागृह (Theatre) आणि मॉलमध्ये (Shopping Mall) नक्कीच गेला असाल. या ठिकाणी टॉयलेटमध्ये जाण्याची वेळ आली असेल, तर एक गोष्ट तुम्हाला खटकली असेल. ती म्हणजे टॉयलेटचे (Toilet) दरवाजे खालून उघडे का असतात? मग प्रश्न पडतो की घरातील टॉयलेटचे दरवाजे पूर्णपणे बंद असतात. मग या ठिकाणी खालून अर्धे उघडे असण्यामागे कारण काय? खरं तर अशाप्रकारे दरवाजे बनवण्यामागे खास उद्देश आहे. अशा दरवाजांमुळे अनेक घटना टाळता येणं शक्य होतं. जर तुम्हाला यात तथ्य वाटत नसेल तर पुढे दिलेली कारणं वाचून तुमचा विश्वास नक्कीच बसेल.

इमरजेंसीसाठी छोटा दरवाजा- एखादी व्यक्ती टॉयलेटमध्ये गेली आणि त्याची तब्येत अचानक बिघडली तर त्याला सहज बाहेर काढणं सोपं होतं. मॉल्समध्ये लहान मुलं टॉयलेटचा वापर करतात. जर चुकून त्यांनी लॉक केलं आणि दरवाजा उघडता आला नाही. तर त्यांना बाहेर काढता येतं. 

अश्लिल कृत्य: हॉटेल्स, मॉल्स आणि सिनेमागृहात अनेक जोडपी येतात. काही जण पब्लिक टॉयलेट्समध्ये अश्लिल कृत्य करतात. मात्र मॉलमधील दरवाजा खालून उघडा असल्याने प्रायव्हसी मिळत नाही. त्यामुळे अश्लिल कृत्य रोखण्यास मदत होते. 

बातमी वाचा- Kitchen hacks: कशाला हवेत महागडे क्लिनर्स; 5 मिनिटात चमकेल गॅस स्टोव्ह...पहा किचन हॅक्स

स्मोकिंग: सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं गुन्हा आहे. त्यामुळे अनेक जण टॉयलेटमध्ये जाऊन स्मोकिंग करतात. पण असं करणं धोकादायक ठरू शकतं. बंद टॉयलेटमध्ये धूर कोंडून श्वास गुदमरू शकतो. पण दरवाजा खालून उघडा असल्याने धोका टळतो.

स्वच्छता- शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स किंवा पब्लिक टॉयलेट्सचा वापर दिवसभर होतो. त्यामुळे साफसफाई करण्यास अडचण येऊ शकते. अर्ध्या दरवाज्यांमुळे टॉयलेट सहज स्वच्छ करता येतं.