आनंद महिंद्रा यांनी का केला 'त्या' गोंडस बाळाचा व्हिडिओ शेअर?

सोशल मीडियावर दररोज एक नवा व्हिडिओ व्हायरल होत असतो.

Updated: May 24, 2021, 01:20 PM IST
आनंद महिंद्रा यांनी का केला 'त्या' गोंडस बाळाचा व्हिडिओ शेअर?  title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज एक नवा व्हिडिओ व्हायरल होत असतो. काही व्हिडिओ खूप काही नव्या गोष्टी शिकवणाऱ्या असतात, तर काही व्हिडिओ जगण्यासाठी उर्जा देतात. काही तर पोट धरून हासण्यास भाग पाडतात. असाचं एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ पोस्ट केला आहे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी.  महिंद्रा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतात. पण आता त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ जरा खास आहे. 

आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'कधी-कधी एक साधा व्हिडिओ पूर्ण मूड बदलतो.' त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आनंद महिंद्रा कायम वेग-वेगळे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण आता त्यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ एका छोट्या बाळाचा आहे. 

व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा एका खूर्चीत मस्त बसला आहे आणि रडत आहे. त्याला शांत करण्यासाठी अनेक पदार्थ त्याच्यासमोर ठेवली जातात. तरी देखील हे गोंडस बाळ शांत बसायचं नाव घेत नाही. लहान मुलांचं सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे न्यूडल्स. 

न्यूडल्स देखील त्याच्या समोर ठेवले जातात, त्यानंतर त्याला दूधाची बाटली देण्यात येते, तरी सुद्धा बाळ काही शांत बसत नाही. त्यानंतर त्याच्यासमोर वाईनच्या ग्लासमध्ये ड्रिंक ठेकली जाते. ड्रिंक पाहाताचं त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.