Wipro Salary cut: नोकरकपातीनंतर आता पगारावर कात्री; फ्रेशर्सचा पगार निम्म्यावर!

Wipro Cuts Freshers Salary upto 50 %: नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच सॅलरीवर विप्रोनं (Wipro Cuts Freshers Salary) गदा आणली आहे. त्यामुळे या पगारकपातीनं मोठा धक्का दिला आहे.

Updated: Feb 22, 2023, 03:34 PM IST
Wipro Salary cut:  नोकरकपातीनंतर आता पगारावर कात्री;  फ्रेशर्सचा पगार निम्म्यावर!  title=

Wipro Cuts Freshers Salary upto 50 %: सध्या सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू झाली आहे. त्यातून नोकरदारांच्या कपाळावर (Lay Off Trend) टांगती तलवार आहे. त्यातून मोठमोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केल्यानंतर आता पगारातही घट (Salary Cut in Wipro) करायला सुरूवात केली आहे. आयटी कंपन्यांमधील सर्वात मोठी कंपनी विप्रो या कंपनीनं फ्रेशर्सना मोठा झटका दिला आहे. त्यांच्या पगारात चक्क विप्रोनं 50 टक्क्यांची घट केली आहे. या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर निंदा करण्यात आली आहे. आयटी युनियनकडून विप्रोच्या (Wipro vs NITES) या निर्णयाची निंदा करण्यात आली आहे. शिक्षण संपवून नोकरीसाठी रूजू झालेल्या फ्रेशर्सना त्यांच्या पहिल्याच जॉबमध्ये मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे परंतु नक्की ही पगार कपात का करण्यात आली याबद्दल जाणून घेऊया या लेखातून. 

नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पहिल्याच सॅलरीवर विप्रोनं (Wipro Cuts Freshers Salary) गदा आणली आहे. त्यामुळे या पगारकपातीनं मोठा धक्का दिला आहे. या विप्रोच्या निर्णयावर कामगार संघटना NITES नं या विप्रोच्या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात धिक्कार केला असून याचा कंपनीनं पुर्नविचार करावा असेही सुचविले आहे. अशाप्रकारे जर का तुम्ही कर्मचाऱ्यावर गदा आणणार असाल तर हा निर्णय अत्यंत निंदनीय आहे. जागतिक स्तरावरूनही याची निंदा करण्यात आली आहे. 

विप्रोच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच फ्रेशर्सना एक पॅकेज जारी केलं आहे. ज्यात फ्रेशर्सना 6.5 लाख रूपयांचे पॅकेज मिळते. यावर्षींही त्यांनी इतक्या रूपयांचे पॅकेज फ्रेशर्सना दिले आहे. परंतु यावेळी मात्र त्यांना 3.5 लाख रूपयांचे वार्षिक पॅकेज जारी केले आहे. त्यामुळे फ्रेशर्सचा मोठ्या प्रमाणात हिरमोड (Freshers Salary Package) झाला आहे. आपण शॉर्टलिस्ट झालो म्हणून अनेकांना आनंद झाला आणि ते आपल्या कंपनीत नियुक्त होण्याची वाट पाहत होते. परंतु त्यांना असा मिळत असलेला कमी पगार ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. 

NITES युनियनं काय म्हटलं आहे? 

आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या NITES (Nascent Information Technology Employees Senat) या युनियनं विप्रोनं घेतलेल्या या निर्णयाचा निषेध केला असून त्यांना या विचाराचा पुन्हा एकदा विचार करण्याचा तात्काळ सल्लाही दिला आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सुलजा (NITES President Harpreet Singh Sluja) यांनी या कंपनीच्या निर्णयाला अन्यायकारक असंच म्हटलं आहे. हा निर्णय तर अन्यायकारक आहेच परंतु त्याचसोबत हा निर्णय कंपनीच्या दृष्टिने निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्वांच्याही विरोधात आहे, असं थेट स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. कंपनीच्या आर्थिक समस्यांचा बोजा हा कर्मचाऱ्यांवर टाकणं अमान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अगोदरही विप्रोच्या काही चुकीच्या निर्णयांवर या युनियननं कारवाई केलेली होती.