Trending videos: बस एवढंच एक कारण निमित्त झालं, वजन कमी करणं राहिलं बाजूलाच महिलांची लाथा-बुक्क्यांची बरसात

Woman Fight In Gym: त्या काळ्या टी-शर्ट महिला धक्का मारला आणि काय...बस हेच एक कारण निमित्त झालं...आणि 

Updated: Oct 12, 2022, 10:39 AM IST
Trending videos: बस एवढंच एक कारण निमित्त झालं, वजन कमी करणं राहिलं बाजूलाच महिलांची लाथा-बुक्क्यांची बरसात title=
Woman Fight In Gym trending video viral on Social media nmp

Women Fight Video: जिममध्ये लोक कॅलरी बर्न (Burn calories) आणि वजन कमी (lose weight) करण्यासाठी जातात. आपण फिट दिसावं म्हणून लोक सकाळ-संध्याकाळ जिममध्ये (Gym) वर्कआऊटसाठी (work out) जातात. पण सध्या जिममधील एक व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. महिलांना भांडायला कारण लागत नाही ना, असंच हा व्हिडीओ पाहून वाटतं. जिमिंग करताना लोकांचा इगो छोट्या छोट्या गोष्टींवर दुखावला जातो आणि मग ते लगेच भांडायला येतात. बस एवढंच एक कारण निमित्त झालं आणि या महिला एकमेकांचे केस उपटायला लागल्या. (Woman Fight In Gym trending video viral on Social media nmp)

जिममध्ये दोन महिलांमध्ये जोरदार भांडण

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्मिथ मशीनवर एक महिला व्यायाम करते. काळ्या टी-शर्ट घातलेली महिला तिच्या व्यायाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. जशी ती महिला व्यायाम संपून पुढे सरकली, मागून पिवळ्या टी-शर्ट घातलेली महिला स्मिथ मशीनवर आत शिरली. त्या काळ्या टी-शर्ट महिला धक्का मारला आणि काय...बस हेच एक कारण निमित्त झालं...आणि या दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी (women fight) सुरु झाली. 

भांडण थांबवण्यासाठी आणखी दोन महिला पुढे येतात आणि त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने गंमतीत म्हटले की, 'बऱ्याच कॅलरीज बर्न झाल्या असतील.' दुसऱ्याने लिहिले की, 'मजबूत केसांसाठी उत्तम कसरत.' मात्र, या मारामारीत कोणीही गंभीर जखमी झाले नाही.