KFC Delivery: महिलेने Online Food केलं ऑर्डर, पण पार्सल खोलताच डोळे फिरले

हॉटेल, रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड मागवण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं. फूड डिलिव्हरी अनेक चांगली वाईट प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे फूड डिलिव्हरीबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते.

Updated: Sep 22, 2022, 04:34 PM IST
KFC Delivery: महिलेने Online Food केलं ऑर्डर, पण पार्सल खोलताच डोळे फिरले title=

Money In Food Packet: हॉटेल, रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड मागवण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलं. फूड डिलिव्हरी अनेक चांगली वाईट प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे फूड डिलिव्हरीबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. मात्र अमेरिकेतील एका महिलेला ऑनलाइन फूड पॅकेटमध्ये नोटांचं बंडल पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका महिलेने केएफसी फूड डिलिव्हरी कंपनीकडून चिकन सँडविच मागवले होते. ऑर्डर कधी येते आणि कधी खाते असं तिला झालं होतं. महिलेचे जेवण आले पण तिच्या फूड पॅकेटमधून नोटांचे बंडल पाहून तिला धक्काच बसला. पॅकेटमध्ये एकूण 43 हजार रुपये निघाले.

अखेर महिलेने प्रामाणिकपणा दाखवत कंपनीला फोन केला. काही कर्मचारी त्यांच्या घरी आले असता संपूर्ण प्रकरण समोर आले. महिलेचे जेवणाचे पाकीट पॅक केले जात होते, त्याचवेळी व्यवस्थापकाच्या चुकीमुळे काउंटरवरील काही अनामत रक्कमही तिच्या पाकिटात गेली होती. नंतर ही बाब कंपनीच्या लक्षात आली. महिलेच्या प्रामाणिकपणावर सध्या कंपनी आणि कर्मचारी खूप खुश होते. मॅनेजरने त्या महिलेचे आभार मानले नाहीतर नोकरी जाऊ शकली असती.

Home Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत

दुसरीकडे, महिलेने सांगितले की, तिने चिकन सँडविच ऑर्डर केले होते आणि त्यातून पैसे निघाले. ती कर्जात आहे आणि ती वापरू शकली असती पण तिने तसे केले नाही. मला पैशांचं बंडल मिळताच मी ती पुन्हा लिफाफ्यात ठेवली आणि परत करण्याचा प्लॅन बनवला. यानंतर मी कंपनीला फोन केला आणि पैसे परत केले.