तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट

Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सदर व्हिडीओमध्ये एक महिला दुकानदारासमोरच शॉर्ट पॅण्ट चेंज करुन बघताना दिसत आहे. हा सारा घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 11, 2024, 10:09 AM IST
तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट title=
हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे

Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: नवी दिल्लीमधील पालिका बाजार येथील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला ग्राहक दुकानाती पुरुष कामगारांसमोरच पॅण्ट बदलताना दिसत आहे. सोश मीडियावर या व्हिडीओवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्लीतील पालिका बाजारमधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र असाच दावा गोव्यासंदर्भातही केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, कोणी शूट केला आहे आणि व्हिडीओमधील महिला कोण आहे यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये

सोशल मीडियावर या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ ज्या पद्धतीने शूट करण्यात आला आहे त्यावरुन तो इन्स्टाग्रामवर रिल म्हणून शेअर करण्यासाठी जाणूनबुजून शूट केल्याचा आरोप अनेकांनीकेला आहे. मात्र ही कृती बऱ्याच लोकांना अजिबात आवडलेली नाही. सवंग लोकप्रियतेच्या नादात असले काही प्रकार करण्याची महिलांना खरंच गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काहींनी तर हे असली रिल संस्कृती भारताची संस्कृती नष्ट करेल अशी भितीही व्यक्त केली आहे. सार्वजनिक ठिकाणी हे असले अश्लीलतेकडे झुकणारे रिल्स शूट करण्यासंदर्भात कठोर नियम केले जावेत अशी मागणीही काहींनी केली आहे. या रिलमुळे मेट्रो, बस स्टॉप, रेल्व स्टेशन्स, मॉल्स, चित्रपगृहे यासारख्या सार्वजनिक ठिकाणीही कोणत्याही पद्धतीची लाजलज्जा न बाळगता तरुण, तरुणी वाटेल त्या पद्धतीने रिल्स शूट करताना दिसत असल्याचा मुद्दा उपस्थित करत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

चेंजिंग रुम असतानाही असं केल्याचा आरोप

काहींनी तर या महिलेने मुद्दाम ड्रेस दाखवले जातात त्याच ठिकाणी शॉर्ट पॅण्ट चेंज केल्याचा आरोप केला आहे. चेंजिंग रुम उपलब्ध असतानाही तिने दुकानदारासमोरच मुद्दाम पॅण्ट बदलल्याचा दावा अनेकांनी केला आहे. अनेकांनी या महिलेने सर्व मर्यादा ओलांडल्या असून व्हिडीओ फारच वाईट असल्याचं म्हटलं आहे.

असं पुरुषाने केलं असतं तर?

हा असा प्रकार एखाद्या पुरुषाने केला असता तर काय झालं असतं असं एका महिलेने विचारलं आहे. तर इतरही अनेक लोकांनी यावर आक्षेप नोंदवले आहेत. 

कठोर नियम तयार करण्याची गरज

रिल्स बनवण्याच्या नादात अनेकजण हल्ली आपला जीवही धोक्यात टाकताना दिसत आहे. लहान मुलं, महिलांसमोर अश्लील चाळे करताना सार्वजनिक ठिकाणी रिल्स शूट करणाऱ्यांचं प्रमाणही दिवसोंदिवस वाढत असल्याबद्दल लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. झी 24 तासने सदर व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही. सदर वृत्त हे सोशल मीडियावरील चर्चेवर आधारित आहे. सोशल मीडियावरील रिल्स शूट करण्यासंदर्भात कठोर नियमावली तयार केली जावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.