Partner Swapping Network In Kerala: नवऱ्याच्या बळजबरीमुळे तिने 9 जणांसोबत ठेवले शरीरसंबंध! तिची हत्या होताच त्यानं विष घेतलं अन्..

Partner Swapping Network In Kerala: या प्रकरणाचा भांडाफोड करण्यामध्ये या महिलेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या महिलेने स्वत:च्याच पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 22, 2023, 02:35 PM IST
Partner Swapping Network In Kerala: नवऱ्याच्या बळजबरीमुळे तिने 9 जणांसोबत ठेवले शरीरसंबंध! तिची हत्या होताच त्यानं विष घेतलं अन्.. title=
Partner Swapping Network In Kerala (File Photo/AP)

Partner Swapping Network In Kerala: केरळमध्ये एक पार्टनर स्वॅपिंग म्हणजेच जोडीदारांची अदलाबदल करण्याचा प्रकार समोर आणणाऱ्या महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टनर स्वॅपिंग नेटवर्कमध्ये आपल्या पत्नीला ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीनेच हे हत्याकांड घडवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्यक्तीने पत्नीला 9 अनोखळी पुरुषांबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र या जाचाला कंटाळून पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर या नेटवर्कचा भांडाफोड झाला आणि अनेकांना अटक झाली होती. मागील वर्षी केरळमध्ये चांगल्याच गाजलेल्या या प्रकरणामधील प्रमुख तक्रारदार महिलेची हत्या शुक्रवारी कोट्याम येथे करण्यात आली. या महिलेला तिच्या माहेरी जाऊन बेदम मारहाण करण्यात आली. यामध्येच या महिलेचा मृत्यू झाला. 

पतीवरच संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे वडील आणि भाऊ कामानिमित्त घराबाहेर गेले होते आणि मुलं खेळण्यासाठी गेली होती त्यावेळेस या महिलेचा नवरा घरी आला. हल्लेखोर कोण होते याबद्दलची माहिती मिळालेली नाही. या हल्ल्यामागे माझ्या मुलीचा पतीच असल्याची शंका महिलेच्या वडिलांनी पोलिसांशी बोलताना व्यक्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या नवऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलेच्या वडिलांनी व्यक्त केलेली शंका खरी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या महिलेच्या नवऱ्याचं नाव शिनो असं आहे. शिनोला पार्टनर स्वापिंग प्रकरणामध्ये यापूर्वीच अटक करण्यात आलेली. तो सध्या जामीनावर बाहेर होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी त्याचा जीव वाचला असून त्याच्या जीवाला सध्या कोणताही धोका नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचा जबाब नोंदवून पोलीस पुढील तपास करणार आहेत.

पतीच्या बळजबरीमुळे 9 जणांबरोबर ठेवले शरीरसंबंध

पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी 2022 मध्ये पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शिनोला अटक करण्यात आलेली. शिनोने त्याच्या पत्नीवरच अन्य एका पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. तो वारंवार पत्नीकडे परपुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करायचा. यावरुन त्यांच्यामध्ये अनेकदा वाद व्हायचे. या सततच्या वादाला कंटाळून या महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये या महिलेने माझा पती पार्टनर-स्वॅपिंग नेटवर्कचा भाग असल्याचं म्हटलं होतं. सोशल मीडियावर हे पार्टनर-स्वॅपिंग नेटवर्क काम करतं आणि यामध्ये हजारोंच्या संख्येनं सदस्य सहभागी आहेत असं या महिलेनं तक्रारीत म्हटलेलं. हे पार्टनर-स्वॅपिंग नेटवर्क टेलीग्राम आणि अन्य मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून कार्यरत आहे. 2 वर्षांच्या कालावधीमध्ये नवऱ्याच्या जबरदस्तीमुळे आपण 9 अनोखळी पुरुषांबरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक दावाही तक्रारीमध्ये संबंधित महिलेने केला होता. 

या महिलेने केलेल्या दाव्यानुसार ज्या पुरुषांबरोबर तिने शरीरसंबंध ठेवले त्यापैकी काही विवाहित होते. आपल्याबरोबर या पुरुषांना सेक्स करु दिल्याने त्यांनी त्यांच्या बायकांबरोबर शिनोला शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी दिली होती असं या महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. या 9 जणांपैकी 5 विवाहित होते ज्यांच्या पत्नीबरोबर शिनोने शरीरसंबंध ठेवले. या तक्रारीमध्ये महिलेने पतीसहीत या सर्व 9 जणांची नावं घेतली होती. यापैकी 7 जणांना पोलिसांनी मागील वर्षी अटक केली होती. 

असं चालायचं हे नेटवर्क

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हे नेटवर्क सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 पासून कार्यरत होते. या नेटवर्कमध्ये 1 हजारांहून अधिक मेंबर्स होते. "टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपवर सदस्य म्हणून जॉइन झाल्यानंतर 2 ते 3 जोडपी प्रत्यक्षात भेटायचे. त्यानंतर महिला पार्टनरची अदलाबदल केली जायची. काही वेळेस एक महिला 3 पुरुषांबरोबरही पाठवण्यासाठीही एकमत व्हायचं. या ग्रुपमध्ये काही सिंगल मेंबर्सही होते. त्यांना पैशांच्या मोबदल्यात या ग्रुपमधील इतर व्यक्ती त्यांच्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी द्यायचे," असं पोलिसांनी सांगितलं. या नेटवर्कमधील जोडपी ही एकमेकांना हॉटेल्स आणि लॉजऐवजी एकमेकांच्या घरीच भेटायचे असंही पोलिसांनी सांगितलं.