प्रसूतीनंतर 3 दिवसांतच महिलेने घेतला टोकाचा निर्णय, नवजात बाळ शेजारी रडत राहिले पण...

Women Killed HerSelf After Delivery: प्रसूतीनंतर आलेल्या नैराश्याने महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. प्रसूतीनंतर अवघ्या तीन दिवसांतच आईने.. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2023, 12:01 PM IST
प्रसूतीनंतर 3 दिवसांतच महिलेने घेतला टोकाचा निर्णय, नवजात बाळ शेजारी रडत राहिले पण...  title=
Women dies by suicide 3 days after giving birth to son

Women Killed HerSelf After Delivery: गरोदरपणानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होताता. अशावेळी वजनदेखील वाढते. मात्र, बाळाच्या जन्माच्या आनंदव्यतिरिक्त आईचे या गोष्टींकडे तितकेसे लक्ष नसतेच. कारण पहिल्यांदा आई होण्याचा आनंद हा निराळाच असतो. सकारात्म पद्धतीने हा काळ एन्जॉय करता आला पाहिजे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक मन सून्न करणारी घटना घडली आहे. बाळाच्या जन्माच्या तीन दिवसांतच आईने आयुष्य संपवल्याची घटना घडना आहे. या घटनेने महिलेच्या पतीसह संपूर्ण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  

बाळाच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशीच महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेचे वय अवघे 27 वर्षे आहे. प्रसूतीनंतर शरीरात बदल झाले होते. तसंच, शरीरा बेढब दिसू लागल्याची भीती तिला जाणवत होती. तसंच, यामुळं पुढं भविष्यात नोकरी मिळणार नाही, या निराशेने तिला ग्रासले होते. यामुळंच विवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे. तिच्या पतीच्या व्हॉट्सअॅप चॅटवरुन तसे पुरावे मिळाले आहेत. 

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये हा प्रकार घडला आहे. महिला परदेशी नागरिक असून तिचे नाव ओकसाना ममचर असे आहे. घरातील स्टोअर रुममध्ये तिने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ती तिच्या सासरी राहत होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला ही मुळ युक्रेनची रहिवाशी आहे. ओकसाना ममचर तीन महिन्यांपूर्वी तिच्या सासरी लखनऊमध्ये आली होती. तिथे ती तिची सासू रूथ आणि नणंद रुफीना व युहानासोबत राहत होती. तर, ओकसानाचे पती हे युक्रेनमधील एका विद्यापिठात पीएचडीची तयारी करत आहेत. 

14 जून रोजी एका खासगी रुग्णालयात ओकसानाने एका मुलाला जन्म दिला. तिची प्रसूती नॉर्मल झाली होती. त्यानंतर व्हॉट्सअॅप आणि फोनवरुन तिचे सासत्याने तिच्या पतीसोबत बोलणं होत होते. 

तिच्या फोनमधील सापडलेल्या चॅटनुसार, मुलाला जन्म दिल्यानंतर ती नेहमी तिचे वाढलेले वजन आणि बेढब झालेल्या शरीरामुळं चिंतेत होती. शरीराची ठेवण बिघडण्याने आता मला कोणी नोकरी देणार नाही, अशी चिंता तिला होती. असं तिने चॅटमध्ये म्हटलं आहे. 

नैराश्याने ग्रासल्यामुळं महिलेने घरातील स्टोअर रुममध्ये गळफास घेत जीवन संपवले. तर, एकीकडे नवजात मुलगा दुसऱ्या खोलीत झोपला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

परदेशी महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या मृतदेहाशेजारी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाहीये. पोलिसांनी युक्रेनमध्ये असलेल्या तिच्या पतीला घटनेची माहिती दिली आहे. तसंच, घरातील सदस्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.