बँक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार

पैसे कमावण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली ऑफर आलीये. प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडले जाऊन अर्थाच बँक मित्र बनून तुम्ही महिन्याा पैसे कमवू शकता. 

Updated: Oct 30, 2018, 11:11 PM IST
बँक मित्र बनून तुम्ही कमवू शकता पैसे, दर महिन्याला मिळेल पगार title=

मुंबई : पैसे कमावण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी चांगली ऑफर आलीये. प्रधानमंत्री जनधन योजनेशी जोडले जाऊन अर्थाच बँक मित्र बनून तुम्ही महिन्याा पैसे कमवू शकता. बँक मित्रला कमीत कमी  पाच हजार रुपयांचे फिक्स वेतन मिळते. याशिवाय खात्यांच्या देवाणघेवाणीवर वेगळे कमिशनही मिळणार. याशिवाय बँक मित्रासाठी एक वेगळी कर्जाची स्कीमही तयार करण्यात आलीये. यात कम्प्युटर, वाहनसाठी कर्जंही बँक देईल. 

कोण आहे बँक मित्र

बँक मित्राची जबाबदारी म्हणजे प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बँकेच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणे. ज्या ठिकाणी बँकेची शाखा नाहीये अथवा एटीएम नाहीये तेथील लोकांपर्यंत प्रधानमंत्री जन-धन योजनेची माहिती पुरवणे तसेच त्या लोकांपर्यंत पैसा पोहोचवण्याचे काम बँक मित्र करतो. 

वेतनाशिवाय मिळणार कमिशनही

बँक मित्रसाठी कमीत कमी फिक्स वेतन हे ५ हजार रुपये. तसेच खाते खोलणे आणि त्यातून होणाऱ्या व्यवहारांसाठी त्यांना वेगळे कमिशनही ठरवण्यात आलेय. याशिवाय बँक मित्रला कम्प्युटर, वाहन खरेदी करण्यासाठी १.२५ लाख रुपयांपर्यतचे कर्जही मिळेल. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बँक मित्राची गरज पाहता त्याला १.२५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

कोण बनू शकेल बँक मित्र?

यात ५० हजार रुपये उपकरणांसाठी, २५ हजार रुपये कार्यशील पुंजी आणि ५० हजार रुपये वाहन कर्ज मिळेल. यासाठी ३५ महिन्यांपासून ते ६० महिन्यापर्यंत कर्ज मिळेल. कर्जासाठी १८-६० वर्ष वयोगटातील व्यक्ती पात्र असतील. कोणतीही वयस्क व्यक्ती बँक मित्र बनू शकते. याशिवाय निवृत्त झालेले बँक कर्मचारी, शिक्षक, बँक, सैन्यातील कोणत्याही व्यक्ती पात्र ठरतील. याशिवाय केमिस्ट शॉप, किराणा शॉप, पेट्रोल पंप, स्वयं सहाय्यता समूह, पीसीओ, कॉमन सर्व्हिस सेंटरही बँक मित्र बनू शकतात.

काय करणार बँक मित्र

प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बचत आणि इतर सुविधांची माहिती देणे.
बचत आणि कर्जासंबंधी माहिती पुरवणे.
ग्राहकांची ओळख बनवणे
प्राथमिक माहिती, आकडे गोळा करणे, फॉर्म साभांळून ठेवणे, लोकांकडून मिळालेली माहिती तपासणे, लोकांकडून जमा केलेले पैसे बँकेत जमा करणे.
खात्यांशी संबंधित फॉर्म भरणे
कॅश योग्य वेळेत भरणे
खाती तसेच अन्य सुविधांशी संबंधित माहिती उपलब्ध करुन देणे.