‘या’ नंबरवर SMS करुन तुम्ही मिळवू शकाल सर्व गाड्यांची माहिती

तुम्ही केवळ एका एसएमएसवर कुठल्याही गाडीची माहिती मिळवू शकता

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 13, 2017, 07:56 PM IST
‘या’ नंबरवर SMS करुन तुम्ही मिळवू शकाल सर्व गाड्यांची माहिती title=
Representative Image

मुंबई : आपल्यापैकी सर्वांनाच वाटत असतं की, आपली स्वत:ची एक गाडी असावी. नवी गाडी परवडत नसल्याने अनेकजण जुनी गाडी घेण्याचं ठरवतात. मात्र, जुनी गाडी खरेदी करण्यापूर्वी त्या गाडीची कागदपत्रे, गाडी कुणाच्या नावावर आहे, कधी खरेदी केली होती अशा प्रकारची माहिती मिळवणं गरजेचं असतं.

सध्या जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना आपल्याला पहायला मिळत आहे. अनेक पोर्टलच्या माध्यमातून गाड्यांची खरेदी-विक्री केली जाते.

तुम्हाला आवडणाऱ्या गाडीची माहिती तुम्ही स्वत: मिळवू शकता आणि ती सुद्धा केवळ एका SMSवर. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे. तुम्ही केवळ एका एसएमएसवर कुठल्याही गाडीची माहिती मिळवू शकता.

केंद्र सरकारने आपल्या महत्वाकांक्षी डिजिटल इंडिया योजने अंतर्गत ही मेसेज सुविधा सुरु केली आहे.

अशा प्रकारे मिळवा कुठल्याही गाडीची माहिती...

तुम्हाला केवळ एक SMS करावा लागणार आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या मेसेजमध्ये VAHAN टाईप करा आणि त्यानंतर गाडी क्रमांक लिहा आणि ७७३८२९९८९९ या क्रमांकावर एसएमएस (SMS) करा. हा SMS सेंड झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत तुम्हाला त्या गाडीची सर्व माहिती आणि ती सुद्धा अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.

SMS च्या माध्यमातून मिळणार ही माहिती

- गाडीच्या मालकाचं संपूर्ण नाव

- गाडी कुठल्या पत्त्यावर घेतली आहे तो पत्ता

- गाडी ज्या आरटीओ क्षेत्रात गाडी रजिस्ट्रेशन केली आहे याची माहिती

- गाडी कर्ज काढून घेतली असेल तर त्या फायनान्स कंपनीचे नाव

- एक्सपायरी डेटही उपलब्ध होणार