झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द

विवादीत इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. विदेश मंत्रालयाच्या निर्देशावरून मुंबई रिजनल पासपोर्ट ऑफिसने कारवाई करत पासपोर्ट रद्द केला आहे.

Updated: Jul 19, 2017, 01:56 PM IST
झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द title=

नवी दिल्ली : विवादीत इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. विदेश मंत्रालयाच्या निर्देशावरून मुंबई रिजनल पासपोर्ट ऑफिसने कारवाई करत पासपोर्ट रद्द केला आहे.

पासपोर्ट रद्द करण्यापूर्वी 3 जुलै ते 13 जुलैदरम्यान रिजनल पासपोर्ट ऑफिसने झाकीर नाईकला हजर राहण्यास सांगितले होते. झाकीर नाईक सध्या मलेशियात असल्याची माहिती मिळते आहे. टेरर फंडींग केसमध्ये एनआयने जाकीर नाईकला समन्स बजावला होता. तसेच जाकीर नाईक याला ईडीने चारवेळा चौकशीकरता हजर राहण्याकरता समन्स बजावले होते. मात्र जाकीर नाईक हजर न राहिल्याने शेवटी त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं होतं.