तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून...

Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2024, 10:24 AM IST
तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून... title=
अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस मोजायचे कपड्यांची लांबी (फोटो: Twitter/@16OSullivan02)

Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: केवळ हॉलिवूडच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हल्ली अभिनेत्री सहज स्विमिंग सूट किंवा बिकिनी परिधान केलेल्या दिसून येतात. आता वन पीस असो अथवा टू पीस असो बिकिनी ही सामान्य बाब झाली आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा परदेशामध्येही बिकिनी परिधान करणं हे चुकीचं मानलं जायचं. सार्वजनिक ठिकाणी बिकिनी परिधान करणाऱ्या तरुणांना दंड ठोठावला जायचा. आज आपण त्याच कालावधीबद्दल जाणून घेणार आहोत जेव्हा स्विमिंग सूट, बिकिनी परिधान केल्याच्या गुन्ह्याखाली महिलांना तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. 

स्विम सूटमुळे तिच्यावर घातली बंदी

रेअर हिस्टॉरिकल फोटोज आणि द वायरच्या अहवालानुसार अमेरिकेसारख्या देशामध्येही स्विमिंग सूट परिधान करण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. न्यू जर्सीमधील अटलांटिक सिटीमधील समुद्रकिनाऱ्यावर शर्टलेस होऊन फिरणाऱ्या पुरुषांवरही कारवाई केली जायची. पुरुषांना शर्ट काढून या समुद्रकिनाऱ्यावर येण्यास बंदी घालण्यात आली होती. 1900 च्या कालावधीमध्ये महिलांचे स्विम सूट हे हाय नेक पद्धतीचे होते. स्विम सूटच्या बाह्या फार लांब होत्या तसेच त्यावेळी स्विम सूटच्या खाली पॅण्टही परिधान केली जायची. ऑस्ट्रेलियन स्विमर आणि सिने अभिनेत्री एनेट केलरमॅनने जेव्हा वन-पीस स्विम सूट परिधान करुन समुद्रकिनारी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.

कपडे आखूड असले तर...

1908 साली को बॉस्टन नावाच्या व्यक्तीला समुद्रकिनाऱ्यावर अटक करण्यात आली होती. या व्यक्तीने परिधान केलेल्या स्विम सूट वेअरमधून त्याचे हात, पाय, मान यासारख्या गोष्टी दिसत होत्या, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. 1922 मध्ये अमेरिकेतील शिकागो पोलीस तर महिलांच्या स्विम सूटची लांबी मोजू लागले होते. यामागील मुख्य कारण म्हणजे नवीन तंत्रज्ञान आणि फॅशनप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या कापडापासून स्विम सूट तयार होऊ लागल्याने ते अधिक आखूड आणि तंग होऊ लागले. महिलांच्या स्विम सूटची लांबी मोजल्यानंतरच त्यांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्याची परवानगी दिली जायची. ज्यांचे स्विम सूट जर निर्धारित लांबीपेक्षा आखूड निघाले तर त्यांना दंड ठोठावला जाई.

पावती फाडायचे पोलीस

1920 च्या सुरुवातीला कोनी बेटावरील समुद्रकिनाऱ्यावर बीच सेन्सर्स बसवण्यात आले होते. म्हणजेच महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी सर्वसामान्यांप्रमाणे अंडरकव्हर एजंटप्रमाणे समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालायचे. छोट्या आकाराचे कपडे परिधान केलेल्या महिलांना हे पोलीस ताब्यात घ्यायचे. केवळ अमेरिकाच नाही तर स्पेन, इटली आणि पोर्तुगालसारख्या देशांमध्येही बिकिनीवर बंदी घालण्यात आली होती. 1957 पर्यंत ज्या मुली समुद्रकिनाऱ्यांवर बिकिनी परिधान करुन दिसायच्या त्यांना पोलीस सध्या ज्यापद्धतीने वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर पावती फाडली जाते तशी पावती फाडून दंड ठोठवायचे. जसजसा स्विम सूटचा ट्रेण्ड अधिक लोकप्रिय आणि जनमान्य झाला आणि अभिनेत्रींनी चित्रपटांमधून स्विम सूट तसेच बिकिनी परिधान करण्यास सुरुवात केली त्याप्रमाणे त्याला समाजात अधिक अधिक मान्यता मिळाली आणि हे निर्बंध कालबाह्य झाले.