12 Oct 2017, 13:43 वाजता
मुंबई : नांदेडबरोबर राज्यात पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि भांडूपमध्ये पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली.
- पुणे मनपा पोटनिवडणुकीत भाजप रिपाई आघाडीच्या हिमाली कांबळे विजयी झाल्यात.
- कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झालेत. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला.
- मुंबईतील भांडूप पोटनिवडणुकीत शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांचा पराभव भाजपच्या जागृती पाटील यांनी केला.
- नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग ३५च्या पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला.
12 Oct 2017, 12:31 वाजता
मुंबई : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. तर शिवसेना आमदारांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागल्याने सेनेसाठी हा पराभव चिंतेचा आहे. दरम्यान, या विजयामुळे पालिकेत भाजपने संख्याबळाचा ८३ चा आकडा गाठलाय. तर शिवसेनेचा ८४ आहे.
12 Oct 2017, 12:05 वाजता
नागपूर : पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, संदीप गवई यांचा विजय, विजयानंतर नागपुरात जल्लोष
12 Oct 2017, 11:58 वाजता
पुणे : पोटनिवडणुकीत आरपीआय-भाजप युतीच्या हिमाली कांबळे विजयी झाल्यानंतर जल्लोष करताना
12 Oct 2017, 11:53 वाजता
मुंबई : भांडूप पोटनिवडणुकीत भाजप विजयी; आशिष शेलार यांनी मानले आभार
पोटनिवडणूकीतही भाजपलाच मुंबईकरांची साथ! भांडूपमधे भाजपा उमेदवार जागृती पाटील यांचा विजय... मुंबईकरांचे, भांडुपकरांचे आभार!!
— ashish shelar (@ShelarAshish) October 12, 2017
12 Oct 2017, 11:27 वाजता
मुंबई : भांडूपमधून सौ. जागृती प्रतीक पाटील विजयी, शिवसेना आमदारांच्या पत्नीचा पराभव, शिवसेनेला आत्मपरिक्षणाची गरज
12 Oct 2017, 11:20 वाजता
पुणे : विजयानंतर हिमाली कांबळे यांना अश्रु अनावर, विजयी झाली तरी दुःख आहे, वडील हवे होते, वडिलांवर सर्वांनी प्रेम केले, सर्वांनी केलेल्या कष्टाच हे यश आहे, हा विजय माझ्या वडिलांना समर्पित करते - हिमाली
12 Oct 2017, 11:07 वाजता
मुंबई : भांडूप पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार जागृती पाटील चौथ्या फेरीतही आघाडीवर
12 Oct 2017, 11:00 वाजता
पुणे : भाजप आरपीआय युतीच्या हिमाली कांबळे पोटनिवडणुकीत विजयी, चार हजार मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँगेसच्या धंनजय गायकवाड यांचा केला पराभव.
12 Oct 2017, 10:46 वाजता
पुणे : कोरेगाव पार्क पोटनिवडणुकीत भाजप आरपीआयच्या हिमानी कांबळे विजयी, हिमाली यांनी घेतली होती 4483 मतांची आघाडी