सेल्फीच्या नादात 2 युवक धबधब्यात पडले

सेल्फी काढणं पडू शकतं महागात

Updated: Jun 28, 2018, 07:59 PM IST

मुंबई : सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवक धबधब्यात पडल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा येथे घडली. सेल्फी काढण्यासाठी हे दोघे युवक धब्धब्याच्या वरच्या बाजुस गेले होते. फोटो काढण्याच्या नादात दोन्ही युवक धबधब्याच्या प्रवाहात पडले. सुदैवाने पाण्याच्या प्रवाह कमी असल्याने आणि दोन्ही युवकांना पोहणे येत असल्याने दोघेही बचावले. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धब्धब्यात पडुन मृत्यू होण्याच्या घटना याधी घडल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला विभागना-या पैनगंगा नदीवरील हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र येथे सुरक्षारक्षक नाहीत.