जुगारासाठी ग्राहकांनी गहाण ठेवलेले 3 कोटींचे सोनं विकलं; भांडुप येथील SBI बँकेच्या मॅनेजरचा प्रताप

भांडुप येथील SBI बँकेत विचित्र प्रकार घडला आहे. बँक मॅनेजरने  जुगार खेळण्यासाठी ग्राहकांनी बँकेत गहाण ठेवलेल्या 3 कोटींच्या सोन्यावर डल्ला मारला आहे. 

Updated: Mar 4, 2024, 09:33 PM IST
जुगारासाठी ग्राहकांनी गहाण ठेवलेले 3 कोटींचे सोनं  विकलं; भांडुप येथील SBI बँकेच्या मॅनेजरचा प्रताप   title=

Bhandup Crime News : एकदा जुगाराचे व्यसन लागले की माणसाला कशाचेच भान राहत नाही. जुगारामुळे अनेकांचे आयुष्य आणि संसार उद्धवस्त झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. मुंबईतील भांडुप परिसरात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. एसबीआय बँकेमध्ये तारण ठेवलेले ग्राहकांचे तीन करोड चे सोने बँक व्यवस्थापकाने ऑनलाइन रमी गेम मध्ये पैसे लावण्यासाठी लुटले आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

नेमकं काय घडलं?

27 फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची जबाबदारी होती. त्यांनी कोअर बँकिंग सिस्टीममध्ये (CBS) तशी नोटही दाखल केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब असल्याचे दिसले. त्यांनी कागदपत्रे व्यवस्थित तपासली असता, बँकेच्या या शाखेने सोनं तारण ठेवून 63 ग्राहकांचे सोने तारण ठेवून कर्जे दिली होती. लॉकरमध्ये असलेल्या 63 सोन्याच्या पाकिटांपैकी 59 पाकिटे गहाळ झाली होती. लॉकरमध्ये केवळ 4 पाकिटे शिल्लक होती. अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. 

बँक अधिकाऱ्यांनी सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के याला तातडीने पाकिटाबाबत चौकशी केली. मस्के यांने दागिने गहाळ केल्याची कबुली देत यापैकी काही सोने दुसरीकडे तारण ठेवले तर काही सोन विकल्याची कबुली दिली. मी लवकरच सोने परत करतो असे बोलून त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला. परंतु बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोने तारण ठेवून मिळालेले पैसे मनोज मस्के याने ऑनलाईन रमी गेम मध्ये लावल्याची यावेळी पोलिसांना दिली दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास भांडुप पोलीस करीत आहे

राष्ट्रीय स्तरावर वाहन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

राष्ट्रीय स्तरावर चोरीचे वेगवेगळयां कंपनीचे ट्रक, आयशर टेम्पो व इतर वाहने चोरी करुन, बनावट कागदपत्रे तयार करुन त्याची विक्री करनाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष 1 ने अटक केली आहे. चार आरोपी जेरबंद करण्यात आले आहे. विविध राज्यातुन चोरी केलेली 7, 32, 41000 किंमतीची 47 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली आहे. यात तपास सुरू असून आणखीन आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपासा दरम्यान आरोपीतांनी प्रथमतः खोट्या कागदपत्रांच्या आधारे वाहने अस्तित्वात नसताना अरुणाचल प्रदेश, नागलैंड इ. राज्यांतील विविध आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये वाहनांचे रजिस्ट्रेशन करुन रजिस्ट्रेशन नंबर व इतर कागदपत्रे प्राप्त केली. त्या कागदपत्रांच्या आधारे सदरची वाहने महाराष्ट्र राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावयाची आहेत असे सांगुन संबंधीत आर.टी.ओ. कार्यालयाची ऑनलाईन एन.ओ.सी. प्राप्त केली. तदनंतर कागदपत्रांवर नमूद असलेल्या मेक आणि मॉडेलप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांतुन गाड्या चोरी केल्या. चोरलेल्या वाहनांचे मुळ इंजिन नंबर, चेसिस नंबर व इतर ओळख पटविण्यासाठी लागणारे नंबर खोडुन त्यावर बनावट कागदपत्रांवरील इंजिन, चेसिस नंबर प्रिंट करुन महाराष्ट्रातील आर.टी.ओ. मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन केले आणि तीच वाहने इतर लोकांना विकली.