कोल्हापुरात जप्त केलेले ५ टन चंदन लाकूड, ४ किलो चंदन तेलाची चोरी

वनविभागाच्या नर्सरीत जप्त केलेल्या ११ टन चंदना पैकी ५ टन चंदनाचे लाकूड आणि ४ किलो चंदन तेलाचे डब्बे चोरट्यांनी पळवून नेले आहे. 

Updated: Jul 18, 2017, 09:34 PM IST
कोल्हापुरात जप्त केलेले ५ टन चंदन लाकूड, ४ किलो चंदन तेलाची चोरी title=
संग्रहित छाया

कोल्हापूर : वनविभागाच्या नर्सरीत जप्त केलेल्या ११ टन चंदना पैकी ५ टन चंदनाचे लाकूड आणि ४ किलो चंदन तेलाचे डब्बे चोरट्यांनी पळवून नेले आहे. या ठिकाणी रात्रपाळी करणाऱ्या दोन सुरक्षारक्षकांना बांधून ही चोरी करण्यात आली आहे. या संदर्भात करवीर पोलिस स्टेशन ला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोल्हापूर जिल्ह्यातील रजपुतवाडीच्या वनविभागाच्या नर्सरीत दरोडेखोर शिरले आणि त्यांनी या ठिकाणी रात्रपाळी करणा-या दोन सुरक्षारक्षकांना धमकावून त्यांना बांधून ठेवलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये भरुन ठेवलेल्या ११ टन चंदनापैकी ५ टन चंदन तर कार्यालयात सील करुन ठेवलेल्या चंदन तेलाच्या डब्यांपैकी ४ किलो चंदन तेलाचे डब्बे अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी पळ काढला. 

वडगांव परिसरात २०१० साली बेकायदेशीर चंदन तेलाची वाहतूक करताना ८ किलो चंदन तेल जप्त करण्यात आले होते. तर २०१२  साली बेकायदेशीच चोरटी चंदनाची लाकडे वाहतूक करणा-या ट्रकवर कारवाई करण्यात आली होती. या वेळी ११ टन चंदन पोलिसांनी जप्त केले होते.हा जप्त केलेला मुद्देमाल कोर्टाच्या आदेशा प्रमाणे वनविभागाच्या रजपुतवाडी नर्सरीत ठेवण्यात आला होता. आज पहाटे याच मालावर दरोडा टाकण्यात आला आहे.

चिखलीतल्या वनविभागाच्या या नर्सरीमध्ये कोट्यवधीचा माल पडून आहे, असं असतानाही केवळ विनाशस्त्र केवळ दोन सुरक्षारक्षक ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.