नांदेड: लोहा नगरपरिषदेसाठी सरासरी ८०% मतदान

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला

Updated: Dec 9, 2018, 07:23 PM IST
नांदेड: लोहा नगरपरिषदेसाठी सरासरी ८०% मतदान title=

नांदेड : लोहा नगरपरिषदेसाठी सरासरी ८०% मतदान झालं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मतदार संघातील या निवडणुकीकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी एकूण ५४ उमेदवार तर नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी चार जण रिंगणात आहेत. दिवसभरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. 

गत निवडणुकीत अशोक चव्हाणांनी मनसेसोबत छुपी युती करत चिखलीकरांचं पानीपत केलं होतं. आताही चव्हाणांनी मोठी ताकद या निवडणुकीसाठी लावली होती. सध्या भाजपच्या तंबुत असलेल्या सेना आमदार चिखलीकरांसाठीही ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. भाजपला आपली ताकद पटवुन देण्यासाठी चिखलीकारांची परीक्षा घेणारी ही निवडणूक ठरणार आहे.