दलित तरूणाला झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण; अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आलीय. शेळी चोरल्याच्या संशयावरून त्याच्यासह अमानुष कृत्य करण्यात आलेय. 

Updated: Aug 26, 2023, 04:04 PM IST
दलित तरूणाला झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण; अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार title=

Ahmednagar Crime News : माणुसकीला काळीमा फासणारा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. मारहाण झालेला तरुण अल्वयीन आहे. अत्यंत किरकोळ कारणावरु त्याला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची देखील मागणी केली जात आहे. 

शेळी चोरल्याच्या संशयावरून या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेय. त्याच्यासह  इतर काही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव इथं हा अमानुष प्रकार घडला आहे. 
अत्यंत अमानुष कृत्य

 मारहाण करणा-यांनी तरूणाला झाडाला उलटं लटकावलं आणि माणुसकीला लाजवणारं कृत्य केलं. पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणेल असाच हा प्रकार आहे. या घटनेनंतर नगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळलीय. रिपाइनं आक्रमक पवित्रा घेत या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केलीय. तसच आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

जळगावमध्ये दलित मुलांना मारहाण करून धिंड काढली

जळगावमध्ये दलित मुलांना मारहाण करून धिंड काढल्याचा घटनेचे पडसाद सांगलीमध्ये उमटले आहेत. या घटनेचा निषेध करत दलित महासंघाने मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. गृहमंत्री असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी करत पुतळा जाळलान्यात आला. शहरातील एस टी स्टयांड समोरील चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.

अहमदनगरमधून बांगलादेशी ताब्यात

अहमदनगरच्या खंडाळा परिसरातून चार बांगलादेशीना ताब्यात घेण्यात आले. तर, सहा बांगलादेशी फरार झाले आहेत. नाशिक एटीएस आणि नगर तालुका पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. खंडाळा येथील एका क्रेशर प्लांटवर काही दिवसांपासून बांगलादेशी लोक ओळख लपवून राहत असल्याची माहिती नाशिक एटीएसला मिळाली होती या माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिसांना सोबत घेऊन संबंधित क्रेशरवर छापा टाकण्यात आला यात चार बांगलादेशी काम करताना मिळून आले आहेत या चार जणांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट कागदपत्र आणि पासपोर्ट देखील आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात दहा जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलंय. हे सर्वजण मजुरी कामा साठी ओळख लपून काम करत असल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं असल्याचं पोलिसांनी सांगितला असून याबाबत अधिक तपास करत असल्याचं म्हटलं आहे.