Shocking News: कैद्याच्या पार्श्वभागात सापडला मोबाईल आणि बॅटरी; झडती घेणारे पोलिस झाले शॉक

मोबाईल सापडलेला आरोपी प्रणय बुरसे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रॉबरी आणि खंडणीची गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये औरंगाबाद येथील कारागृहातुन तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. 

Updated: Jan 7, 2023, 09:52 PM IST
Shocking News: कैद्याच्या पार्श्वभागात सापडला मोबाईल आणि बॅटरी; झडती घेणारे पोलिस झाले शॉक title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : कैद्याच्या पार्श्वभागात मोबाईल आणि मोबाईलची बॅटरी(mobile phone and mobile battery) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार पाहून झडती घेणारे पोलिसही शॉक झाले आहेत. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हा धक्कादाय प्रकार घडला आहे. यामुळे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृह(Nagpur Central Jail) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. यापूर्वी देखील नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल तसेच गांजा देखील सापडला होता. 

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील गुजरात येथील न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा कारागृहात आणण्यात आले. कारागृहात आल्यानंतर अंगझडती घेताना कैद्याजवळ मोबाईल आणि बॅटरी आढळून आली. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली आहे. 
प्रणय बुरसे नावाच्या कैद्याकडून कारागृह प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल आणि मोबईलच्या तीन बॅटरी जप्त केल्या आहेत. या कैद्याचा झडती घेत असताना मोबाईल आणि तीन बॅटरी त्याने गुप्तांगात(पार्श्वभागात) लवपलेले मोबाईल आणि बॅटरी सापडली.  

गुजरात येथे एका प्रकरणात न्यायालयापुढे साक्ष देण्यासाठी प्रणय याला नेले होते. शनिवारी पहाटे नागपूर कारागृहात पुन्हा परत नेताना त्यांची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून गुप्तांग(पार्श्वभागात) एक मोबाईल आणि तीन मोबाईल बॅटरी, आणि एमसील साहित्य मिळून आल्यानं एकचं खळबळ उडाली. याची तात्काळ माहिती धंतोली पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात जाणून पंचनामा करत साहित्य जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

सराईत गुन्हेगार दुसऱ्यांदा भोगतोय शिक्षा

प्रणय बुरसे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रॉबरी आणि खंडणीची गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. 2018 मध्ये औरंगाबाद येथील कारागृहातुन तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. यापूर्वी त्यांनी एका गुन्ह्यात सात वर्षाची शिक्षा भोगून पूर्ण केली होती.  आता तो मागील चार वर्षांपासून नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे.

कारागृह शिक्षेसाठी की गुन्हेगारांचा मौजमस्तीसाठी

नागपूर कारागृहात सप्टेंबर 2022 मध्ये अश्याच पद्धतीनं सुरज कावळे नामक कुख्यात गुंडाकडूम न्यायालयीन साक्ष पूर्ण केल्यानंतर कारागृहात नेत असतांना झाडाझडती घेतली असता गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 300 पोलीस कर्मचाऱ्यांना साह्यानं क्राईम ब्रांचकडुन पोलीस कारागृहात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. यानंतरही अशा घटना उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासनाचे दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा झाली होती. महिन्याभरापूर्वीच कारागृहात काही कारागृह कर्मचारी हे एशोआरांमाचे साहित्य पुरवत असल्याचं रेटकार्ड समोर आले होते. त्यामुळे गुन्हेगार शिक्षा भोगत आहे की मौज मजा करत आहे असा सवाल कारागृहात चालत असलेल्या प्रकारांमुळे उपस्थित होऊ लागला होता. यामध्ये  प्रणय बुरसे हा पोलीसांच्या कैदेत साक्ष देण्यासाठी गेला असतांना त्याच्याकडे मोबाईल आणि साहित्य कुठून याचा शोध लागणे ही गरजेचे आहे.