येवल्यातल्या आंचलगावात भीषण अपघात, ५ ठार ७ गंभीर जखमी

येवलातल्या कोपरगावात आंचलगावमध्ये अपघातात ५ ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Updated: Jun 4, 2017, 07:33 PM IST
येवल्यातल्या आंचलगावात भीषण अपघात, ५ ठार ७ गंभीर जखमी title=

येवला : येवलातल्या कोपरगावात आंचलगावमध्ये अपघातात ५ ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर, टाटा मॅजिक आणि आपे रिक्षामध्ये हा अपघात झाला. येवल्याकडून शिर्डीला जाणा-या टाटा मॅजिकला समोरून येणा-या कंटेनरनं उडवलं. वळणावर कंटेनरचालकाचा ताबा सुटला आणि त्याची आपे रिक्षाला धडक बसली. यात टाटा मॅजिकचा चालक जागीच ठार झाला. तर आंध्र प्रदेशातल्या दोन भक्तांचाही मृतांमध्ये समावेश आहे. मृतांमध्ये एक महिला आहे. जखमींवर येवला ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.